पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७८ व्यवहारमयूष. 66 "साहसास ज्या स्त्रीचा उपयोग इतरानें घेतला त्या स्त्रीस घरांत गुप्तपणें ठेवावी, तिचे शरीराची घांस धू विशेष न करतां तिला मलीन राहू द्यावें, जमिनीवर निजवावें, आणि अन्नाचा गो- ळा तिला देत जावा ( ह्मणजे सरासरी जीव राहाण्यापुरतें अन्न द्यावें. ) १६७० तोच स्मृ- तिकार “ ज्या स्त्रीचा संभोग कमी वर्णाचे पुरुषानें घेतला तिला टाकून द्यावी किंवा ती वघास योग्य होय. " वध सांगितला आहे तो संभोग होण्यास स्त्रीची इच्छा असल्यास असे समजावें. कनिष्ठ, मध्यम, व उत्तम साहसाबदल शिक्षा नारद सांगतो शिक्षा अपराधाचे स्वरूपानुरोधानें केली पाहिजे. अगदी कनिष्ठ प्रतीचे साहसास शंभर पणांपेक्षां कमी दंड असूं नये; मध्यम प्रतीचे साहसास, शास्त्रज्ञ पुरुषांनी सांगितल्याप्रमाणे पांचशे पणांपेक्षा कमी असूं नये; उत्तम प्रतीचे साहसास शिक्षा एक हजार पणांपेक्षां कमी असूं नये. देहांत शिक्षा, [ अपराध्याचें ] सर्वस्व जप्त करणे, शहरांतून बाहेर घाल- वून देणें, डाग देणें, [ ज्याचे द्वारें अपराध घडला तो ] शरीरावयव कापून टाकर्णे, या शिक्षा उत्तम प्रतीचे साहसास सांगितलेल्या आहेत. १६७२ वध करण्याचा, शरीरावयव- च्छेदन करण्याचा, व इतर शिक्षा करण्याचा अधिकार राजासच [ दिलेला ] आहे, इतरास नाहीं, कारण शिक्षा करण्याचा अधिकार राजाचाच आहे. साहसप्रकरण समाप्त. व्यभिचार. [ स्त्री संग्रहण. ] • पराचे स्त्रीचा जबरीनें संभोग करणें हें साहस ह्मणून त्या अपराधाबद्दल शिक्षा पूर्वी ( साहसप्रकरणांत ) सांगितलीच आहे. सरपुरुषाचे स्त्रीशीं कप- टानें संग केल्यास त्याबद्दल शिक्षा बृहस्पति सांगतो " जो कपटानें परस्त्रीशी सँग करील त्यास [ त्याबद्दल ] शिक्षा [ अशी की ] त्याचें सर्वस्व हरण करानें, शिवाय त्याचे अंगावर योनिचिन्हाकृति डाग देऊन त्यास शहराबाहेर घालवून द्यावें. " सर्वहर: ' [ ह्मणजे ] सर्वस्व हरण केले जाते जिच्यामध्ये ती शिक्षा, सवर्णा स्त्रीशीं व्यभिचार केल्यास ही समजावयाची. पुरुषाहून कमी वर्णाची असल्यास वर सांगितलेले दंडाचे अर्ध्यानें दंड; आणि उंच वर्णाची असल्यास त्याबद्दल शिक्षा वध. या- विषयीं तोच स्मृतिकार “समवर्णाच्या स्त्रीशीं [व्यभिचार केल्यास] जी शिक्षा [ आहे ] तिचे अर्ध्यानें कमी वर्णाचे स्त्रीशीं व्यभिचाराबद्दल शिक्षा [ आहे ]. परंतु [ आपल्याहून ] उंच वर्णाच्या स्त्रीशों [पुरुषानें] संग केल्यास त्यास [त्याबद्दल] शिक्षा वध. ११ ३७४. व्य- 6 ६७१ क० वि० ६७३ वी : प० १५५० ६७२. मि० व्य० प० ८१ पृ० १; वी० प० १५३ पृ० १- ७४ बी० प० १५४१०२.