पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २७९ भिचाराचे संबंधाने सर्वात कमी, मध्यम, व सर्वात ज्यास्ती अशा तीन शिक्षा तोच स्मृ- तीन प्रकारचे १,६७६ तिकार सांगतो “ [ वर सांगितलेले ] व्यभिचारांस अनुक्रमाने प्रत्येकी स्वल्प, मध्यम, व अतिभारी असे दंड ही शिक्षा आहे. परंतु गुप्त ठिकाणी जबरदस्तीनें संभोग केल्यास याहूनही विशेष सक्त [ शिक्षा देण्यास हरकत नाहीं ]. ११६७५ दुर्वृत्त पुरुषाने परस्त्रीशी संभाषण केल्यास त्याबद्दल शिक्षा मनु सांगतो ( अ० ८ श्लो० ३१४ ) “ ज्याचे दुर्गुणाबद्दल पूर्वी बोभाट झालेला असेल असा पुरुष परस्त्रीशी गुप्त- पणें भाषण करील तर त्यास कनिष्ठ प्रतीचे दंडाची शिक्षा केली पाहिजे. परकीय स्त्रीपुरुषांस परस्परांशी संभाषण करण्याबद्दल मनाई त्यांचे बापांनी किंवा इतर संबंध्यांनी केलेली असूनही तीं स्त्रीपुरुष प्रीतीनें परस्परांशी भाषण करतील तर त्या- बद्दल शिक्षा याज्ञवल्क्य सांगतो (व्य० श्लो० २८५ ) " [ परपुरुषाशी संभाषण वगैरे न करण्याबद्दल ] एक वेळ ताकीद दिली असूनही स्त्री चुकेल तर तिला शंभर पण दंड करावा, आणि [ परस्त्रीपाशी संभाषण न करण्याबद्दल ताकीद असूनही ] पुरुष तसें क रील तर त्यास दंड दोनशें पण; परंतु उभयतांही स्त्रीपुरुषांस मनाई केली असून [ त चुकतील तर त्यांस ] व्यभिचाराची शिक्षा दिली पाहिजे. १६४७ स्त्री किंवा पुरुष यांतून एकास प्रतिबंध केलेला असेल अशा ठिकाणी या स्मृतीचे पूर्वार्ध लागू समजावें. स्त्री ब पुरुष या दोघांच्याही कामेच्छेनें व्यभिचार केल्यास त्या अपराधाबद्दल शिक्षा याज्ञवल्क्य सांगतो (व्य० श्लो० २८६ ) " स्वजातीचे स्त्रीशी [ व्यभिचारानें संग ] केल्यास [ त्याबद्दल शिक्षा ह्मणून ] पुरुषास अंतिभारी दंड करण्याचा अधिकार आहे ; कमी जातीचे स्त्रीशीं [ केला असल्यास मध्यम [ दंड ] ; [आणि] [ पुरुषानें ] स्व- जातीपेक्षा उंच जातीचे स्त्रीशी [ संग] केल्यास त्यास देहान्त शिक्षा; व स्त्रीस तिचे कान व दुसरे अवयव कापून टाकण्याची शिक्षा करावी. १६७८ 66 कात्यायन सर्व प्रकारचे अपराधांत, पुरुषास जो [ द्रव्याचे स्वरूपाचा ] दंड सांगितलेला असेल त्याचे अर्ध्यानें स्त्रीस दंड करावा. जेथें पुरुषास देहान्त शिक्षा सांगितलेली ६७५ बी० प० १५५ पृ० २ य/बृहस्पतिवचनाचा शेवटचा चरण येथें 'अधिकोपि बलाद्ग्रहः ' असा आहे, पण (ज) या खुणेचे पुस्तकांत व वीरमित्रोदयांत 'अधिकोद्रविणाधिके' असा पाठभेद आहे. ६७६ वी० प० १५६ पृ० १; क० वि०. ६७७ या वचनांत ‘स्त्रीनिषेधे शतं दण्डया द्विशतं तु दमं दुमान्' असा पाठ आहे, परंतु मिता- क्षराग्रंथांत 'स्त्रीनिषेधे शतं दद्याद्विशतं तु दमं पुमान् ' असा पाठभेद आहे. ६७८ जी० प० १५५ पृ० २; क० वि०; व्य० मा० या याज्ञवल्क्यवचनाचे आरंभी 'समजातौ ' असा येथे पाट आहे; परंतु मिताक्षस्त्रग्रंथांत 'स्वजातौ ' असा पाठभेद आहे. 9