पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

6 नीलकंठीय २७७ ही मूल्यवान् पदार्थांचे संबंधानें चोरलेले किंवा खराब केलेले जिनगीचे मानानें दंड ध्यावा, किंवा चोराची योग्यता पाहून राजानें त्यास दुप्पट दंड करावा; किंवा तशा प्रकारचा पुनः अपराध होऊं नये ह्मणून जरूर असेल तर अपराध्यास देहांत शिक्षा करावी " ६६६ ' यौषेयं ' ह्मणजे स्त्रियांचें धन . वा' शब्दाचा अर्थ एव ( निश्चयार्थक ). मदनाचे मत असें आहे की, ' विनाशयन् ' ( नाश करणारा), 'हर्त्ता ' ( जबरीनें चोरी करणारा ) इत्यादिक वरील स्मृतीतील शब्दांकडे पहातां हें वचन साहस अपराधाचे संबंधानें असावें, चोरीचे संबंधानें नसावें [ असें दिसतें. ] 66 साहस करविणारास दंड याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० २३१ ) " कोणी मनुष्याने दुसऱ्याकडून साहस [ अपराध.] करविल्यास त्यास दुप्पट दंड करावा; आणि 'मी तुला अमुक बक्षीस देईन' असें ह्मणून जो साहस करवील त्यास चौपट दंड. १६६७ ' द्वैगुण्यं' ' चातुर्गुण्यं ' ( दुप्पट आणि चौपट ) यांचा अर्थ प्रत्यक्ष अपराध करणारास जो दंड सांगितला आहे त्याचे दुप्पट, आणि चौपट, असें समजावयाचें. साध्वी विप्रस्त्रीशी जबरीनें संभोग करील, त्यास दंड मनु सांगतो ( अ० ८ श्लो० ३७८ ) " संरक्षित ब्राह्मणी स्त्रीशीं ब्राह्मण जबरीनें संभोग करील तर त्यास दंड हजार पण. १६६८ परंतु अशा स्त्रीशीं तसा प्रकार क्षत्रिय किंवा इतर जातीचे पुरुषानें केल्यास त्याबद्दल शिक्षा बृहस्पति सांगतो जो पुरुष परस्त्रीशी जबरदस्तीनें जारकर्म करील त्याची सर्व जिनगी राजानें जप्त करवावी. शिवाय अपराध्याचें शिस्न व वृषण कापून टाकवून त्यास गाढवावर बसवून त्याची धिंड काढवावी. “ कामयेत् ' ह्मणजे दुसऱ्याच्या बायकोशीं संभोग करील. क्षत्रियादिक, अनुलोम ( कनिष्ठ वर्णाची स्त्री व वरिष्ठ प्रतीचा पुरुष यांची संतति ) व प्रतिलोम ( कनिष्ठ वर्णाचा पुरुष व वरिष्ठ वर्णाची स्त्री यांपासून झालेली संतति ), जातीचे पुरुषांनी सजातीय परस्त्रीशीं जबरीनें संभोग केल्यास त्याबद्दल शिक्षा. कात्यायन सांगतो " पुरुषानें परस्त्रीशी जबरदस्ती- नें संभोग केल्यास त्याबद्दल त्यास देहांत शिक्षा करावी; [ कारण ] असें कर्म करणें स्वधर्माचे बाहेर पाऊल टाकणे होय. १६७० तोच स्मृतिकार " तिचे इच्छेचे विरुद्ध ६६६ व्य० मा० क० वि०. ६६७ वी० प० १५३ पृ० २; व्य० मा० ; क० वि०. " ६६९ ६६८ मि० ० ० ९० पृ० १० वी० प० १५५ पृ० २; क० वि० ६६९ वी० प० १५४ पृ० २; व्य० मा०; क० वि०. ६७० वी० प० १५४ पृ० २; व्य० मा०; क० वि०. या कात्यायनवचनाचा तिसरा चरण 'व- वे तस्य प्रवर्तेत ' असा येथे आहे. परंतु (क) (ख) (घ) (ङ) (छ) ( ज ) पुस्तकांवर ' वधे तत्र प्रवर्तेत ' असा पाठ असून (च) पुस्तकावर, 'वधस्तत्र प्रवर्तेत ' असा पाठभेद आहे.