पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७४ E46 व्यवहारमयूख. 66 रणारास ) देहान्त शिक्षा देण्यांत पाप नाहीं; मात्र ब्राह्मण व गाई यांस ती शिक्षा नाहीं. ५६५६ कात्यायन "भृगूचे वचनाप्रमाणे तपश्चर्या करणाऱ्या व वेदाध्ययन करणा- या उत्तम वर्णाचे पुरुषांस ते आततायी ( महान् अपराधी ) असले तरी देहान्त शिक्षा नाहीं. खालचे वर्णांचे अपराध्यांस देहान्त शिक्षा आहे. १६५७ आततायी कोणास ह्म णावें हें तोच स्मृतिकार सांगतो " [ घातक काम करण्याचे उद्देशानें ] जो मनुष्य शस्त्र, विष, किंवा अग्नि, यांचा उपयोग करतो, शाप देण्यासाठीं जो आपला हात उचल- तो, अथर्वण वेदांत सांगितलेले मंत्रतंत्रांनी जो जीववात करतो, व राजास बातमी देण्याचे काम करतो, न्याय सोडून जो स्वपत्नीस इजा देतो, व दुसऱ्याचे दोष बाहेर काढण्यां जो तत्पर असतो हे सर्व पुरुष, व अशीच दुष्कृत्ये करणारे असतील त्यांस आ ( महापराधी ) ह्मणावें. " वसिष्ठाचेंही असेंच वचन आहे लोकांची घरें जाळणारा, विष घालणारा, [ अपराध करण्याचे इराद्यानें ] हाती शस्त्र धरणारा, दुसऱ्या द्रव्य चोरणारा, तसेंच दुसऱ्याची जमीन किंवा बायको चोरणारा, या साहांस आततायी झणतात. परंतु “ [ घात करावयाचे इराद्यानें ] कोणी आततायी अंगावर येऊन पडल्यास मनुष्यानें त्यास कांहीं विचार न करितां ठारच करावें; तो आपला गुरु असो, वयाने लहान असो, ह्यातारा असो, किंवा बहुश्रुत ब्राह्मण असो,६५९ असें मनुवचन आहे (अ० ८ श्लो० २५० ) ; आणि “ प्राणघात करण्याचे इराद्यानें जो आततायी चालून येईल त्यास ठार मारावें, मग तो ( आततायी ) वेदपारंगत असला तरीही चिंता नाहीं. तसें करण्यानें ब्रह्महत्त्येचे पातकं लागणार नाहीं १,६६० असें कात्यायन- वचन आहे [ याची व्यवस्था अशी ]: वरील दोन वचनांत वा ( अथवा ) अपि (स- हार्थक ही ) हीं पढ़ें आहेत त्यांवरून ब्राह्मणव्यतिरिक्त आततायींचा वध करावा इतक्यापुरती मात्र हीं वचनें लागू होतात. खालीं लिहिलेले गालव व बृहस्पति यांचे वचनांवरून मिताक्षरा ग्रंथांत याचें स्पष्टीकरण असें केलेले आहे "आततायी · १६५८ ६५६ मि० व्य० प० १० पृ० १; वी० प० ७ पृ० २. ६५७ वी० प० ८ पृ० १; तेथे दुसऱ्या चरणाचे शेवटीं 'जन्मतः' असा पाठ आहे, पण येथे ' संयुते ' असा पाठ आहे. 'पापं हीनवधे तु न ' असा तेथें चवथा चरण आहे, पण येथें ' पापे हीने बधो भृगुः' असा पाठ आहे. ६५८ मि० व्य० १० पृ० २; बी० प० ६ पृ० २. ६५९ वी० प० ६ पृ० २; मि० व्य० प० १० पृ० १ ; क० वि०. ६६० मि० व्य० प० १० पृ० १ ; वी० प० ६ पृ० २; क० वि० या कात्यायनवचनाचे शेवटीं 'वेदांतपारगम्' असा पाठ येथे आहे, परंतु 'वेदांतगं रणे' असें पाठांतर मिताक्षरा, वीरमित्रोदय, व कमला- कर यांचे मध्ये आहे.