पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 नीलकंठीय २७३ तीने चांगला शोध करून, तसेच गुप्त राहून खून करणारे कोण याचाही तसाच शोध ला- खून, त्यांची सर्व जिनगी जप्त करून देहांत शिक्षा देण्याच्या निरनिराळ्या [ ज्या ] रीति सांगितलेल्या आहेत त्यांप्रमाणें त्यांस राजानें देहांत शिक्षा केली पाहिजे. १६५३ तोच स्मृतिकार अनेक पुरुष रागाचे भरीत असून एकट्या मनुष्यास [ ठार मरेपावेतों ] मारतील, तर त्यांपैकीं मर्मस्थानावर ज्याने मारले असेल तो घातक ( खून करणारा ) मानिला जाईल. १६५४ कात्यायन " जो साहसाच्या अपराधास आरंभ करतो, जो त्या कामांत मदत करतो, जो ( अशा अपराध्यास) रस्ता दाखवितो, जो त्यांस आश्रय ( राहाण्यास जागा वगैरे ) देतो, किंवा दुर्वर्तनाचे पुरुषांस जो शस्त्रं देतो किंवा अन्न पुरवितो, त्याचप्रमाणे युद्ध करण्यास जो मसलत देतो, नाश करण्यास [ इतरांस ] जो प्रवृत्त करतो, जो निराळा उभा राहातो ( ह्मणजे मारामारीत इजा झालेले माणसास मदत करीत नाहीं ), [ मेलेले ] माणसाची जो निंदा करतो, जो [ घातक मनुष्याचीं कर्में ] पसंत करतो, किंवा एखादा अपराध न होऊं देण्याचे सामर्थ्य अंगीं असूनही अपराध होण्यास प्रतिबंध करीत नाहीं, हे सर्व त्या अपराधांत साथी समजावे. सह- न करण्याची त्यास जशी शक्ति असेल तदनुरूप त्यास राजानें शिक्षा केली पाहिजे. १६५३ · ब्राह्मणास शिक्षा देण्याचे संबंधानें नारद विशेष नियम सांगतो “ देहांत शिक्षा होण्यास पात्र [ जे अपराधी असतील ] त्या सर्वांस (सर्व वर्णांस ) शिक्षा करण्याचा हा नियम सारखा लागू समजावा; मात्र ब्राह्मणास हा लागू नाहीं. [कारण ] ब्राह्मण दे- हान्त शिक्षेस पात्र नाहीं [ असें सांगितलेले आहे ]. त्यास शिक्षा ह्मटली ह्मणजे त्याची हंजामत करवून त्यास शहराबाहेर घालवून देऊन, त्याचे कपाळावर दुष्कृत्याचा डाग देववून, गाढवावर बसवून त्याची धिंड काढावी. १६५५ मोठे अपराध- -घरे जाळ गें, विष घालणें, शस्त्राने वध जमीन किंवा बायको हिरावून घेणें वगैरे गुन्हे करणारा) असेल तरी त्यास देहांत शिक्षा नाहीं, कारण सुमंतूचें असें वचन आहे कीं, ' आततायी पुरुषांस ( महान् साहसें क- ६५३ बी० प० १५४ पृ० १; क० वि० ; व्य० मा०. ब्राह्मण आततायी ( ह्मणजे करणें, द्रव्य चोरणें, इतरांची ६५४ वी० प० १५४ पृ० २ क० वि० 'मर्मप्रहारको य तु घातकः स उदाहृत: ' असा येथें पाठ आहे ; परंतु ( क ) ( ख ) (घ) (ङ) ( छ ) ( ज ) या पुस्तकांत 'मर्मप्रहारका ये तु घातका स्त 'उदाहृत: ' असा पाठ आहे. वीरमिोदय व कमलाकर यांमध्ये येथे असलेले पाठाप्रमाणेच पाठ आहे ब तो पाठ व्यांस मान्य आहे. ६५५ वा० प० १५३ पृ० २ ; क० बि०. ३५