पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवाहाविषयीं. (६८.) दोघी बहिणी दोनां भावांस देणें हें तर सांप्रत वहिवाटीत असून सर्व- मान्य अहे. मोठ्या मोठ्या कुळांत मुंबईमध्येही हा आचार चालू आहे. ७४ प्र० २ (६९. ) विरुद्ध संबंध: - पुष्कळ प्रकारचे विरुद्ध संबंध तर सांप्रत आचा- रप्राप्तच झालेले आहेत. जलें चुलता व पुतण्या या दोघांस दोन बहिणी दिल्याची उदा- हरणे आहेत. तसेंच आत व तिची भाची (बहिणीची मुलगी) दोघां भावांस दिल्याचीं- ही उदाहरणे आहेत. ७५ (७०.) कन्यादानः-गोत्रप्रवराच्या अडचणीच्या निरसनाथ अविवाहित क न्थेचे दत्तविधान करण्याचा संप्रदाय प्राचीन कालापासून चालू आहे. असे दिसतें, आणि सांप्रतही आचार तसाच आहे.. तशा विधीनें सापिण्ड्यमात्र कायमच राहा- जेथें देशाचाराने त्याचा योग्य संकोच केला आहे, तेथें त्याचा संकोच तें; होईल. ( ७१. ) सप्रवर संबंधः-प्रवराविषयींही असाच गोंधळलेला. आचार दिसतो. अष्टागर इत्यादि प्रांतीं सप्रवर संबंधाची वस्ती आहे; परंतु आतां ते सर्व ब्राह्मणांतच आहेत, आणि जरी कांहीं कुलांशी त्यांचे संबंध होत नव्हते, तरी आवां तेंही मान हळू हळू नाहींसें झाले आहे असे सिद्ध आहे. कित्येकांशी पूर्वी अन्नव्यवहार कर- प्यास लोक मार्गे पाय घेत ती आतां संभावितांतील कुलै गणिली जाऊन त्यांशीं उत्तम् ब्राह्मणकुंलांचे विवाहसंबंध पुष्कळ होतात. 9 ७६ ( ७२. ) क्षत्रिय व वैश्य ह्या दोन्ही जाति नाहींत अर्से कोणी ह्मणतात. तें संगणे बराबर नाहींसें मला वाटतें. परंतु यांस गोत्र व प्रवर मूळचे नाहीतच हे स्पष्ट आहे. ह्याविषयों कमलाकर ह्मणतो:- “स्त्रगोत्राद्यज्ञाने तु. सत्याषाढः । अथानाज्ञात- बंधोः पुरोहितप्रवरेणाचार्यप्रवरेण वेति । आचार्यगोत्रप्रवरानभिज्ञस्तु द्विजः स्वयम् । 66 ७४. पहा नारायण भट्टकृत मुहूर्तमार्तंड ग्रंथांत विवाहप्रकरणांतील ५१ व्या श्लोकाचा उत्तरार्ध ये-' प्रमाणे :- “नैकस्मैदुहितॄद्वयंसहजयोनैकोद्भवेकन्यकेदद्यादुद्वहनं मिथोनतनुयात्कुर्यादसम्पद्यदः ।। 2 अर्थ:-एका पुरुषास दोन बहिणींचे कन्यादान करूं नये. दोन सख्ये भावांस, दोन सख्या. बहिणी देऊं नये. एकमेकांच्या पुत्रास परस्पर कन्यादान करूं नये ( साटेलोटें करूं नये ). हा मार्ग. आपत्तिकाळांत केला असतां चालेल. ७५. ह्या विषयाची आणखी माहिती पाहिजे त्याने आमच्या मोठ्या इंग्रजी ग्रंथाचीं पृष्ठे ३९५ पासून ४४० पर्यंत पहावी. ७६. पाहा माझा इंग्रजी मोठा ग्रंथ भाग २ रा पृ० ४१२-४१३,