पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ व्यवहारमयूख. देववून निरनिराळे शारीर दंड ( फटके वगैरे ) जे सांगितलेले आहेत त्या दंडांनी चोरांस राजानें शिक्षा करवावी. १६४८ नारद " पळून गेलेले चोरांस अन्न व आश्रय जे देतात ते, व धरण्याचें सामर्थ्य असतांही जे चोरांस पळून जाऊं देतात तेही, त्या अपराधांत सामील (ह्मणजे गुन्ह्याचे अपराधी ) असें समजावयाचें " ६४७ त्यांस शिक्षाही तीच मिळावयाची. चोरी करणें हें प्रकरण समाप्त. मोठे अपराध. [ साहस.] यांचे स्वरूप नारदानें सांगितलेले आहे " कमी किंवा ज्यास्ती मगरूरपणानें को- णावर जबरदस्ती करून जें कर्म केलें जातें त्यास 'साहस' ह्मणतात; [कारण] येथें 'सहः ' या शब्दानें बल ह्मणजे जबरी असें समजावयाचें १६४९ बृहस्पति सांगतो “ मनुष्यवध, जबरीची चोरी, परस्त्रीशी अयोग्य संबंध ठेवणें, आणि दोन्ही प्रकारचें पारुष्य ( शिवी - गाळ आणि मारामारी) या साहसाच्या चार जाती होत. १६५० 'उभयं ' ह्मणजे दोन्ही, ह्मणजे शिवीगाळ आणि मारामारी. नारद सांगतो " फळांचा, मुळांचा, किंवा पाणी वगैरेचा, किंवा शेतकीच्या हत्यारांचा, नाश करणें, तीं दूर फेंकून देणें, व तीं पायांखाली तुडविणें वगैरे प्रकारचीं कृत्यें, यांस पूर्व साहस ह्मणजे अल्प किंवा अगदीं खालचे प्रतीचें साहस असें ह्यटलें आहे. वस्त्रे, जनावरें, अन्न, पान ( पिण्याचे पदार्थ ), आणि गृहकृत्यांतील वस्तु यांचा गैरउपयोग वर सांगितल्या प्रकारांनी केल्यास त्यास मध्यम साहस ह्मणावें. विष घालून, किंवा शस्त्रानें, किंवा अशाच दुसऱ्या रीतीनें, मनुष्य- वध करणे, परस्त्रीशी अयोग्य संबंध ठेवणें आणि जेणेंकरून प्राणास धोका येऊं शकेल असें कोणतेंही कृत्य करणें, यास उत्तम साहस ( झणजे वरच्या प्रतींचें साहस ) ह्मणतात. याज्ञवल्क्य (व्य० श्लो० २७३ ) बंदिग्राह (देवधर्मा- संबंधी मालमत्तेची घर फोडून चोरी करणारे), तसेंच जे घोडे किंवा हत्ती चोरतात ते, व जे बलात्कारानें खून करतात, त्यांस राजानें सुळावर चढवावें ( चढवून देहांत शिक्षा क-- रवी. ) बृहस्पति “ प्रसिद्ध खुनी असे कोण कोण आहेत याबद्दल बारीक री- ११६५२ ६४८ वी० प० १५२ पृ० १ ; क० वि०. ६४९ मि० व्य० प० ८१ पृ० १० वी० प० १५३ पृ० १. ६५० वी० प० १५३ पृ० १; क० वि०; व्य० मा०. 66 ६५१ मि० व्य० प० ८१. पृ० १० वी० प० १५३ पृ० १; क० वि०, व्य० मा०. ६५२ वी० प० १५२ बी॰ पृ० १; क० वि० ; व्य० मा० 'शूलानारोपये नरान् असा येथें पाठ आहे, परंतु ' शूलानारोपये नृपः ' असाही पाठभेद आहे: (क) (ख) (घ) (क).