पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० 38 6 व्यवहारमयूख.. 6.6 . त्यांस फांशीची देहांत शिक्षा द्यावी ). १६३७ खिसे कापायची दोन बोर्डे, पहिल्या अपराधाबद्दल [ राजानें ] कापवावी; दुसऱ्यानें तोच अपराध त्यावर शाबीत झाल्यास एक पाय व एक हात कापवावे; तिसऱ्यानें अपराध केल्यास तो देहांत शिक्षेस पात्र होतो. १६३८. 'अंगुली ' ( दोन बोटें ) [ असें स्मृतींत आहे ] त्याचा अर्थ, आंगठा आणि तर्जनी. चोरीचा माल बरोबर घेऊन चोर पळून गेल्यास त्यासंबंधाने विशेष नियम नारद सांगतो ज्या अधिकाऱ्याच्या हद्दीत चोराने चोरी केली त्या अधिकाऱ्यानें सर्व प्रयास करून चोरास पकडले पाहिजे ; [ त्याचे हद्दीचे ] बाहेर चोर गेल्याबद्दल सुगावा किंवा पायांचा माग न लागल्यास त्याजकडून [ ह्मणजे गांवचे जबाबदार अधिका- प्याकडून ] झालेले नुकसान भरून देवविलें पाहिजे. • तसेंच एकाद्या गांवाचे हद्दीचे बाहे- र चोर गेल्याबद्दल मार्ग लागला असूनही तो माग दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गेल्याचें खा- त्रीनें शाबीद होत नसल्यास सामंत ( शेजारचे गांवचे लोक ), मार्गपाल ( रस्त्यावरील रख- वालदार), आणि दिक्पाल ( गांवाचे वस्तीचे नाक्यावरचे रखवालदार) यांजकडून नुकसान- भरून देववावें. "६४० याज्ञवल्क्य (व्य० श्लो० २७२ ) ज्या खेडेगांवचे हद्दीत [ चोरी झाली ] त्या खेडेगांवानें, किंवा [ दुसरे ठिकाणी चोरी झाली असून तिचा ] ज्या गांवांत माग येऊन पोंचेल त्या गांवकऱ्यांनी चोरी भरून दिली पाहिजे. [ गांवापासून ] एका कोसाहून ज्यास्ती अंतरावर चोरी झाली असल्यास भोवतालचे पांच गांवचे किंवा दाहा गांवचे [ लोकांनीं ती भूरून दिली पाहिजे ]. 66 स्त्रीस चोरून नेल्यास त्यासंबंधानें शिक्षा व्यास सांगतो " स्त्रीस चोरून नेणाऱ्या- स लोखंडाच्या पलंगावर निजवून व [ सभोंवतीं ] गवत पेटवून जाळून टाकावें; आणि पु- रुषास चोरून नेईल त्याचे हातपाय तोडून टाकून चवाठ्यावर नेऊन त्यास टाकावें. बृहस्पति “ गाई चोरून नेणाऱ्याचे नाक कापून टाकवून नंतर त्यास बांधून पाण्यांत ६३७ वी० प० १५२ पृ० १; क० वि०; व्य० मा० . ११६४२- ६३८ वी० प० १५२ पृ० १; मि० व्य० प० ८७ पृ० २; क० वि०; व्य० मा० . येथें हैं वचन बह- स्पतीचे ह्मणून सांगितलेले आहे, तरी मिताक्षरादि ग्रंथांत हैं मनुवचन ह्मणून सांगितलेलें आहे, ह्मणून, व या अर्थाचें बृहस्पतिवचन माधवग्रंथांत कोठे आढळत नाहींत या कारणास्तव, दें मनुवचनच असा निः श्चय होतो. वस्तुतः हें वचन मनुस्मृतीत आहेच ( अ० श्लो० २७७ ). _ ६३९ या ठिकाणीं (ङ ज. ) या पुस्तकांत पुढील नारदवचन ज्यास्ती दृष्टीस येतेंः नारद: " प्रथमः ग्रन्थिभेदानामङ्गुल्यङ्गुष्ठयोर्वधः ". ६४० क० यि०; व्य० भा०मि० व्य० ८७ पृ० १.. ६४१ क० वि०; व्य० मा० .