पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठीय यति असे लोकांस ] दर्शविणारे ढोंगी व अशाच प्रकारचे इतर पुरुष तशा सोंगाखाली मनुष्यहत्या करणारे असतील, त्यांस राजाचे अधिकारी पुरुषांनी फटक्यांची शिक्षा द्यावी. अगदी स्वल्प किमतीचे वस्तूंस कांहीं कृत्रिम संस्कार देऊन भारी किंमतीच्या दिसत अशा केल्यास, व तसें करून अज्ञ माणसांस फसविल्यास, [ कपट करून जो नफा मिळविला असेल ] त्या रकमेचे प्रमाणानें तसे करणान्यास शिक्षा करावी. कृत्रिमानें ( कांही प्रकारचे खोट्या संस्कारांनी ) सोनें (किंवा सोन्याचे डागिने वगैरे ), रत्नें किंवा पोंवळ [ खोटीं ] तयार करील, [ आणि तीं खरीं ह्मणून विकील ], तर खरेदीदारानें दिलेली किंमत त्यास [ विक्री करणाऱ्याकडून ] परत देववून शिवाय त्या किंमतीचे दुप्पट दंड राजास देववावा. [ कांहीं निर्णय करण्यासाठी नेमलेले ] पंच किंवा मध्यस्थ, मेहेर- बानीखातर किंवा लालचीचे कारणानें, किंवा दुसऱ्या कोणत्याही हेतूनें फसवितील ते, व खोटा पुरावा देणारे साक्षीं, यांजकडून [ दाव्यांतील रकमेचे ] दुप्पट दंड देववावा. ”६३२ व्यास " चोरी करण्याचे कार्यांत उपयोगी हत्यारें वगैरे सामान बरोबर असलेले कोणी पुरुष रात्रीचे वेळेस लपत छपत जातांना सांपडतील ते, व त्यांची वस्ती कोठची हें समज- त नसेल ते, यांस झांकले चोर असे समजावें. १६३३ तोच स्मृतिकार " ( १ ) भामट्या ( उचल्या ) , ( २ ) घरफोड्या, (३) भररस्त्यावर दरवडे घालणारा, ( ४ ) खिसे कापणारा ( किंवा अशा प्रकारानें इतर जिन्नस चोरणारा ), ( ५ ) स्त्रिया, ( ६ ) पुरु- ष, ( ७ ) गुरें, ( ८ ) घोडे, किंवा ( ९) इतर जनावरें चोरून नेणारा असे नऊ प्रका- रचे चोर सांगितलेले आहेत. " ६३४ 'संधि' ह्मणजे भिंतीचा वगैरे सांधा. याज्ञवल्क्य 6 66 ५ ( व्य० श्लो० २७५ ) “ खिसे कापणारा व पिशव्या फोडणारा याची [ पहिल्या अपरा- धाबद्दल ] हाताची चिमटी (आंगठा आणि तर्जनी ) कापून टाकावी; [ तोच ] अपराध दुसऱ्यानें केल्यास त्याचा हात किंवा पाय तोडून टाकावा.' ' संदंश: ' ह्यणजे चिम- टा [ ह्मणजे आंगठा आणि पहिलें बोट ज्यास तर्जनी ह्मणतात तें ]. मनु ( अ० ९ श्लो० २७६ ) “ जे चोर भिंती फोडून रात्रीं दरवडा घालतात त्यांचे हात तोडून टाकून त्यांस पाणीदार शुळावर राजानें चढवावें.”६७६ बृहस्पति “त्याचप्रमाणे रस्ता मारणारांस (ह्मण- जे रस्त्यावर दरवडा घालणारांस ) त्यांचे मानेस फांस लावून झाडावर टांगावें (ह्मणजे ६३२ वी० प० १५१ पृ० २ ; व्य० मा० . ६३३ वी० प० १५१ पृ० २; क० वि०. ६३४ वी० प० १५२ पृ० २; क० वि० ; व्य० मा० . ६३५ वी० प० १५१ पृ० २; क० वि०. ६३६ मि० व्य० प० ८० पृ० २; वीं० प० १५१ पृ० १; क० वि०. है मनुवचन मनुस्मृति पुस्तकांत कोठें सांपडत नाहीं.