पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ व्यवहारमयूख. सोन्यावांचून इतर सर्व धातु, आणि तांदूळ, यव यांसारखी इतर प्रकारची [ धान्यें ], यास मध्यम प्रतीच्या वस्तु ह्मटलेलें आहे. सोनें, मूल्यवान खडे, रेशमी वस्त्रे, स्त्रिया, पुरुष गाई, हत्ती, घोडे, आणि देवांचें, ब्राह्मणांचें, व राजाचें [ द्रव्य ], या वस्तूंस उत्तम प्रती- च्या वस्तु अशी संज्ञा आहे. ६२९ उघड चोर [ भामटे, ठक ] वगैरेंचे प्रकार नारद आरंभीं सांगतो “ नैगम ( व्यापारी), ढोंगी वैद्य, लांचखाऊ सभासद (पंच वगैरे ), भा- मटे, [ भविष्य सांगणारे ] जोशी, वेश्या स्त्रिया, कारागीर, खोटे दस्तऐवज करणारे, व गैर- कायदा कामें करणारे, [ लबाड ] मध्यस्थ, खोटे साक्षी, तसेंच हस्तकौशल्य [ दाखवून लबाड्या, व कपटविद्या दाखवून ] निर्वाह करणारे, यांस उघड चोर ह्मणावें. १६३० स्मृ: त्यंतरीं ( दुसऱ्या एका स्मृतींत ) असें सांगितलेले आहे 'उघड चोर, खोटी वजनें व मापें चालविणारे, . लांचखाऊ, कपट करणारे, ठकबाजी करणारे, दुष्ट वर्तन करणाऱ्या बायका, खोटे दस्तऐवज करणारे, आणि भविष्य सांगणारे जोशो हे व अशाच जातीचे [ इतर लबाड लोक ] यांस या पृथ्वीवरील उघड चोर असे समजावें. १६३१ बृहस्पति "जो कोणी सौदागर एखादी वस्तु तिच्यांतील दोष छपवून [ निर्दोष ह्मणून ] विकील, किंवा तींत मिसळ करून, किंवा तिची दुरुस्ती करून [ नवी ह्मणून ] विकील, तर त्याजकडून विकलेले वस्तूचे दुप्पट [ माल ] विकत घेणारास देवविला जाईल; शिवाय विकलेले वस्तू- 66 किंमतीइतका त्यापासून दंड घेतला पाहिजे. जो [ ढोंगी ] वैद्य वैद्यकक्रिया न जा- णणारा, किंवा मंत्र न जाणता असून, अथवा [ जाणता वैद्य असून ], रोगाचें खरें स्वरूप न जाणतां रोग्यापासून पैसा घेईल त्यास चोराची शिक्षा दिली पाहिजे. खोट्या फांशांनी खेळणारे, वेश्या स्त्रिया, राजास मिळण्याचा पैसा जे खातात, गणक, आणि ठक, किंवा भा- मटे, हे लोकांस फसविणारे होत; ह्मणून ते शिक्षेस पात्र आहेत असें सांगितलेले आहे. सभासद ( राजसभेत सल्ला देण्यासाठी बसणारे किंवा पंच वगैरे ) यांनीं [ समजून उम जून ] खोटा निर्णय केल्यास ते, लांच घेऊन त्यावर उपजीविका करणारे, व आपणा- वर विश्वास ठेवणारांस फसविणारे, या सर्वांस हद्दपार करावें. आकाशांतील तारा- नक्षत्रांचं ज्ञान ( ह्मणजे ज्योतिषशास्त्राचें ज्ञान ज्यांस नसून व ज्यांस भविष्य ) काळी होणाऱ्या गोष्टी समजत नसूनही मनुष्यांस शकुनादिक भविष्ये सांगतात, त्यांस हरप्रयत्नानें शिक्षा करावी. दंड, कृष्णाजिनें वगैरे, सामग्री बरोबर घेऊन [ आपण ६२९ वी० प० १५० पृ० २ ; क० वि०. ६३० वी० प० १५१ पृ० १; क० वि०; व्य० मा० . ६३१ वी० प० १५१ पृ० १ ; क० वि० ; ष्य० मा० हें नारदवचन आहे, असें वीरमित्रोदय, मा- धव व कमलाकर यांत सांगितलेले आहे.