पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २६७ मारणा-यांपैकी प्रत्येकास, [ अपराध करणारा एकटा असतां ] जो दंड त्यास ठरविण्यांत आलेला आहे. त्याचे दुप्पट दंड केला पाहिजे. ६२५ कात्यायन " शरीरास किंवा इंद्रियास इजा केल्याबद्दल जसा दंड केला जातो, त्याचप्रमाणें [ ज्याचा अपराध केला असेल त्याची ] कोपशांति करण्यासाठी व [ झालेली इजा ] बढी होण्यासाठी त्यास योग्य पुरुषां-- नी ठरविलें जाईल तें [ अपराध्यांकडून ] देवविलें पाहिजे. १६२६ ' तुष्टिकरं ' ह्मणजे अप-- राधितास संतोष होण्याजोगें में दिलें जातें तें .. " समुत्थानं ' ह्मणजे औषधोपचारार्थ झालेला खर्च. 'पंडितैः' ह्मणजे त्या कामांत जाणते असतील त्यांनी [ ठरविलेलें ]. याचा तात्पर्यार्थ असा कीं, जाणत्या मनुष्यांनी ठरविलें जाईल तें [ इजा झालेले माणसास ] द्यावें. जनावरांस मारण्याचे संबंधानें. याज्ञवल्क्य सांगतो ( वय ० श्लो० २२१-२२६) · लहान पशूंस [१] इजा दिल्यास, [२] त्यांचा रक्तस्राव केल्यास, [ ३ ] त्यांच्या शाखा (शिंगें वगैरे ) किंवा [ ४ ] अवयव तोडल्यास त्याबद्दल दंड, लहान जनावरां- चे संबंधानें २, ४, ६ व ८ पण असा अनुक्रमें केला पाहिजे. त्यांचें ( पशूंचें ) शिश्न कापल्यामुळे ते मेल्यास त्यांची किंमत. देववून [ शिवाय ] मध्यम साहसाचा दंड देव- विला पाहिजे. [ अशा प्रकारची अपक्रिया ] उंच जातीचे चतुष्पाद जनावरांस केल्यास त्याचे दुप्पट दंडाची शिक्षा केली पाहिजे. १६२७ वृक्षांस इजा केल्यास त्याबद्दल मनु सांगतो ( अ० ८ श्लो० २८५ ) " वृक्षांचा नाश केल्यास त्यांचा उपयोग व त्यांची किंमत यांचे मानानें दंड केला पाहिजे असा नियम ठरलेला आहे. १,६२८ शरीरास इजा 4 करण्याबद्दलचे प्रकरण समाप्त.. चोरी करणें.. ( स्तेय. ) या - [ प्रकरणास ]. विषयीभूत वस्तूंचे तीन वर्ग नारदाने सांगितलेले आहेत:: “ मातीचीं भांडीं, आसनें ( बसण्याच्या बैठकी वगैरे ), बिछाने, [ हस्तिदंतादिक) अस्थींच्या, लांकडाच्या, चर्माच्या, गवताच्या, किंवा अशा प्रकारचे इतर द्रव्याच्या केलेल्या ] वस्तु, [ हरभरे, वाटाणे वगैरे डाळिंब्यांचें ] धान्य, आणि तयार केलेलें अन्न या वस्तूंस क्षुद्र वस्तु ( कमी किंमतीचे पदार्थ ) झटले आहे. रेशीम शिवाय करून इतर सर्व [ प्रकारचीं] वस्त्रे, तसेंच गाईवांचून इतर सर्व जातींची जनावरें, ६२६ वी० प० १४६ पृ० २ ; क० वि० .. ६२७ वी० प० १४७ पृ० २; क० वि० ; व्य० मा० .. ६२८ वी० प० १४७ पृ० १; क० वि०. ६.२५ बी० प० १४७ पृ० १.