पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यवहारमयूख. ( व्य० श्लो० २१६ ) " [ मारण्याची भीति दाखवून ] हात किंवा लाथ उगारल्यास त्याबद्दल शिक्षा ह्मटली ह्मणजे, अनुक्रमें दहा आणि वीस [ पण ] दंड केला पाहिजे. कोणच्याही वर्णाच्या दोघांनी एकमेकांवर शस्त्र उगारल्यास त्याबद्दल सर्व वर्णांस मध्यम साहसाचा दंड सांगितलेला आहे. ”६२० तोच स्मृतिकार ( व्य० श्लो० २१७ - २१८) "कोणाचा पाय, केश, वस्त्र, किंवा हात धरून झटका देऊन जोरानें ओढल्यास [ ओढणा- व्यास त्याबद्दल ] दहा पण [दंड करावा. ] ज्याचे त्याचे वस्त्रानें मुसक्या बांधविलेल्या मनुष्यास जोरानें कोणी ओढील किंवा त्यावर पाय देईल, तर [ तसें करणारास ] शंभर प्रणांची शिक्षा. काठी किंवा दुसन्या कशानें मारून कोणी मनुष्य दुसन्यास इजा देईल, पण त्यापासून रक्तस्राव न होईल तर, त्यानद्दल [ इजा करणारास ] बत्तीस पण दंड केला पाहिजे; परंतु. रक्तस्राव झाल्यास त्याचे दुप्पट दंड. १६२१ [ २१७ श्लोकाच्या ] 'पीडा ' इत्यादि उत्तरार्द्धाचा अर्थ असा की, एखाद्या माणसास त्याच्याच वस्त्रांनी बां- धून त्यास जोराने ओढून जर त्यावर पाय दिला तर तसे करण्याबद्दल दंड शंभर पण. तोच स्मृतिकार " ( व्य० श्लो० २१९ व २१५) " कोणी कोणाचा हात किंवा पाय मोडल्यास किंवा दांत पाडल्यास, कान किंवा नाक तोडल्यास, आणि अंगावरील व्रण फोडल्यास, तसेंच कोणास अगदी मरेमरेतों मारल्यास त्याबद्दल [ अपराध्यास ] मध्यम साहसाचा दंड केला पाहिजे. शरीराच्या ज्या अवयवानें कोणी, ब्राह्मण शिवायकरून, ब्राह्मणास इजा करील त्याचा तो अवयव तोडून टाकावा. [ मारण्यासाठी एखादा अव- यव किंवा शस्त्र नुसते ] उचलल्यास [ ल्याबदल ] सर्वांत अति लहान दंड सांगितला आहे तो करावा. ब्राह्मणास [ शस्त्रानें स्पर्श केल्यास ] त्याचे अर्ध्यानें दंड. १६२२ अंव- मनु ( अ० ८ श्लो० २७९ - २८० ) “ ज्या कोणत्याही अवयवानें अंत्यज स्व- तःहून अधिक उंच वर्णाचे पुरुषास मारील किंवा इजा करील, [ तर त्याचा ] यव कापून टाकिला पाहिजे अशी मनूची आज्ञा आहे. जो कोणी मनुष्य [ दुसन्यास मारण्यासाठी ] आपला हात किंवा काठी उगारील तो [ त्या अपराधाबद्दलं ] हात का- पून टाकण्याचे शिक्षेस पात्र होईल. १६२३ कात्यायन वाक्पारुष्याबद्दल वर्णांचे अनु- • क्रमानें किंवा व्युत्क्रमानें ( त्याचे उलट क्रमानें ) जसे [ निरनिराळे ] दंड ठरविलेले “आहेत तसेच [ त्याच परिमाणानें ] शरीरास इजा करण्याचे अपराधाबद्दलही दंडाची शिक्षा केली पाहिजे. १६२४ विष्णु " एका माणसास जर अनेक जण मारतील, तर 66 . ६२१ वी० प० १४६ पृ० १ ; क० वि० ; व्य० मा० . ६२२ वी० प० १४६ पृ० ११२; व्य० मा० . ६२३ मि० व्य० प० ७९ पु० २, वी० प० १४६ पृ० २ ; व्य० मा०; क० वि०. ६२४ मि० व्य० प० ८० पृ० १ ; वी० प० १४६ पृ० २; क० वि० व्य० मा ९.