पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६४ 66.6 व्यवहारमयूख.. १,६१० मिताक्षराग्रंथकाराचे मताप्रमाणे ( व्य० श्लो० २०४ ) व इतर ग्रंथकारांचे मता- प्रमाणें आई, बाप, भाऊ, सासरा, किंवा गुरु यांजकडे अपराध असूनही त्यांस शि- वीगाळ केल्यास दंड, आणि पत्नीकडे अपराध नसतां शिवीगाळ केली तर मात्र दंड. याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० २०२ - २०९ ) “भुज, मान, डोळे, किंवा मांडी, मोडीन असें भय दाखवून कोणी शिवीगाळ देईल, तर त्यास शंभर पण दंड करावा; परंतु पाय, नाक, कान, हात इत्यादि अवयव [ मोडून टाकण्याचे भीतीसह शिवीगाळ के ल्यास ] त्याचे अर्ध्याइतका दंड करावा. परंतु [ भयप्रदर्शनासहित ] शिवीगाळ अशक्त माणसानें (मटल्याप्रमाणे करण्याचे सामर्थ्य नसलेल्यानें ) केल्यास त्यास दाहा पण दंड करावा; परंतु [ मटल्याप्रमाणें करण्यास सामर्थ्य असलेल्या ] माणसानें असें केल्यास [पूर्वी. सांगितलेला दंड करून ] शिवाय त्याजकडून [ भीति घातलेले माणसाचे ] रक्षणासाठी जामीनही घ्यावा. तोच स्मृतिकार ( व्य० श्लो० २०५ - २११ ) ' तुझ्या बहिणीशीं किंवा मातेशीं जारकर्म करीन' अशा भाषणांनी जो दुसन्यास शिवीगाळ करील त्याजकडून राजानें पंचवीस [पण ] दंड देववावा. तीन वेद वेत्ता ब्राह्मण, राजा, किंवा देव, यांस जो शिवीगाळ करील त्यास उत्तम साहसाचा दंड करौवा. " नारद ह्मणतो " जो कोणी पतितास पतित ह्मणेल किंवा चोरास चोर असें विशेषण देईल तो अपराधी होतो; परंतु खोटसाळपणानें त्यांवर असा आ- रोप आणील तर त्याचा अपराध दुप्पट मोठा होय. १६१३ याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० २०४ ) ज्यास एखादा शारीर अवयव, अथवा ज्ञानेंद्रिय कमी असेल, किंवा जो रोगपीडित असेल, त्याचा उपहास खऱ्याखोट्या किंवा लाक्षणिक भाषणांनी जो कोणी करील, त्यास साडेबारा पण दंड केला पाहिजे. १९३४ उशना अमुक अमुक गोष्ट मी अज्ञानानें, दुर्लक्ष्यानें, मत्सरानें, किंवा अतिपरिचयास्तव झटली खरी, पण मी पुनः असें करणार नाहीं ' अर्से जो कबूल करील, त्यास साधारण दंडाचा अर्धा हिस्सा दंड करावा. 83 9 46 ११६१५ वाक्पारुष्यप्रकरण समाप्त. ६१० वी० प० १४९ पृ० २; क० वि०; व्य० मा० . "666 ६११ या वचनांत ' दण्ड उत्तमसाहसः' असा पाठ आहे, परंतु 'दण्ड ' शब्दाचे ठिकाण 'क्षेप: ' असा मिताक्षरेंत पाठ आहे. ६१२ वी० प० १५० पृ० १; क० वि०. ६१३ बी० प० १५० पृ० १. ६१४ वी० प० १४८ पृ० २० ६१५वी०प० प० १५० पृ० २; क० वि०..