पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ तथोत्तरतः ऊर्णाविक्रयः सीधुपानमुभयतोदद्भिर्व्यवहारः सायुधयिकं समुद्रयानमिति इ- तर इतरस्मिन्कुर्वन्दुष्यति इतरइतरमिन्देश प्रामाण्यादिति । इतरो दाक्षिणात्य इतरस्मि- न्नुत्तरेदेशे मातुलसंबंध कुर्वन्दुष्यतिनस्वदेशे तथेतरउर्दाच्यइतररा स्मन्दाक्षिणदेशे सीधुपाना- दिकं कुर्वन्दुष्यति न स्वदेशे कुतः देशप्रामाण्यात् देशनिबंधनत्वादाचारप्रामाण्यस्येत्यर्थः । तथाचेदेवलः । यस्मिन्देशेय आचारो न्यायदृष्टस्तु कल्पितः । सतस्मितेवकर्तव्यो देशाचारः स्मृतोभृगोः । यस्मिद्देशेपुरेग्रामे त्रैविद्येनगरेपिवा | योयत्रविहितोधर्म स्तंवर्मन विचालयेदि- ति । ननुशिष्टाचारप्रामाण्येसतिदुहितृविवाहोपि प्रसज्येत प्रजापत्तिन तथाचरणात् । त थाचश्रुतिः॑िः । प्रजापतिवैस्वां दुहितरमभ्यध्यायदिति । मैवं । नदेवचरितं चरेदिति न्यायात् । अतएव बौधायनः । अनुष्ठितं तुयद्देवैर्मुनिभिर्यदनुष्ठितं । नानुष्ठेयं मनुष्यैस्तदुक्तं कर्म- समाचारेदिति । तदेवंपूर्वोक्तब्राह्मादिविवाहव्यवस्थया देशभेदविषयव्यवस्थया मातुल- सुताविवाहोऽसपिंडामित्यादिशास्त्रादेवसिद्धः । ” ० ( ६५. ) ह्यान्च प्रकरणास लागून दुसऱ्या प्रकारचे आचारानें कबूल केलेले शास्त्रोक्त संबंध सांगतों : 11 ( ६६.) प्रत्युद्वाहः–स्मृतिवचनें मार्गे पडून देशाचाराप्रमाणेंच वहिवाट करण्याची उदाहरणें पुष्कळ सांपडतील. संस्कारकौस्तुभ या ग्रंथांत नारद स्मृतीतील एक वचन दिलेले आहे:- (प. १९६ पृ. १ पंक्ति ९ व १०). त्यांत प्रत्युद्वाहाचा ( एका कुटुंबांतील भाऊ व बहीण यांच्या, दुसऱ्या कुटुंबांतील बहीण व भाऊ यांशी अनुक्रमें विवाहाचा ) निषेध धरिला आहे. परंतु देशाचार पाहतां वरील स्मृतिवचनाच्या उलट " आहे. हल्लींच्या काळांत उंच उंच घराण्यांत देखील अशासंबंधींची उदाहरणे पुष्कळ अशा संबंधास मराठीत 'बदलावण' ह्मणतात हें प्रसिद्धच आहे. यावरून इतकें स्पष्ट आहे कीं, स्मृतिवचनें मार्गे पडून देशाचारच बलवत्तर झाला आहे. आढळतात. — ( ६७. ) दोन बहिणींशी संबंधः - एका पुरुषाशींच दोन बहिणींच्या विवाहा- बद्दल जीं स्मृतिवचनें आहेत तीं कांही प्रांतांत इतकीं मात्र पाळतात, की एक बहीण जिवंत आहे तोपर्यंत मात्र तिच्या पतीशी दुसऱ्या बहिणीचा विवाह होत नाहीं. परंतु एक स्त्री मृत झाली असतां तिच्या पतीशी तिच्या बहिणीचा विवाह करण्यास कां- हींच हरकत मानीत नाहींत. अशी चाल पडत चालली असे पाहूनच मुहूर्तमार्तंडकार नारायणभट्ट यांनी शके १४९३ त आपल्या ग्रंथाच्या विवाहप्रकरणांत ५१ श्लोकांत (प० ३९ पृ० १ ) “ कांहीं विशेष प्रसंगी अशा विवाहास बाघ नाहीं, " असें लि- हिलेले असावें असें वाटतें. दुसऱ्या कित्येक प्रांतांत असे विवाह निर्विवाद होतात. ए- काच पुरुषाशी दोन किंवा तीनही बहिणींचे विवाह होतात. अशी उदाहरणें या इला- ख्यांतही सांप्रत चालू आहेत. -