पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६२ व्यवहारमयूख. ल्यास त्या बांधापासून फायदा होईल त्यावर हक्क जमिनीचे मालकाचा आहे; मालक नसल्यास १,५९८ राजाचा. ११५९९ तोच स्मृतिकार ( व्य० लो० १५६ ) “ एखादें पाण्याचें धरण ( बांध ) बांधल्यामुळे [ शेताचे मालकास ] विशेष अडचण होत नसल्यास, व त्या- पासून [ इतरांस ] फायदा होत असेल, तर त्यास जमिनीचे मालकानें प्रतिबंध करूं नये. [ तसेंच ] विहिरीसाठी थोडी जागा पुस्त असेल आणि तीपासून पु- ष्कळ पाणी [ लोकांस ] मिळत असल्यास [ तीस प्रतिबंध करूं नये ]. ' न निषेध्यः ' ( प्रतिबंध करूं नये ) हे शब्द पूर्वार्द्धातून उत्तरार्द्धीत अनुवृत्ति क रून घ्यावे. नारदाचेंही असेच ह्मणणें आहे “ दुसऱ्याच्या शेताचे मध्ये जरी व रण बांधले जाईल, व त्यापासून नुकसान थोडे होऊन. फायदा मोठा होत असेल तर तशा धरणास प्रतिबंध करूं नये; कारण थोडासा तोटा होत असल्यास तो सोसून फायदा करून घेणें हें इष्टच आहे. १६०० [ पुनः ] नारद पुष्कळ दि- वसांपूर्वी बांधलेलें परंतु दरम्यान पडून गेलेलें धरण धन्याचे संमताशिवाय कोणी दुरुस्त करील तर त्यापासून होणारा फायदा दुरुस्ती करणारास मिळावयाचा नाहीं. ११६०१ व्यास " कोणी माणूस [ सायानें ] शेत. घेईल आणि त्याची स्वतः ला - वणी करणार नाही किंवा करविणार नाही, तर त्या शेतांत जितकें उत्पन्न होण्यासारखें असेल, तितकें शेताचे धन्यास देववून शिवाय त्याचे किंमतीइतका दंड राजास देववावा. १६०२ ' शदं ' ह्मणजे शेतांत होण्याजोगें उत्पन्न. सीमेचा तंटा ( सीमा- विवाद ) प्रकरण समाप्त. . शिवीगाळ ( वाक्पारुष्य. ) बृहस्पति “[ प्रत्यक्ष ] व्यक्तीचें [ नांव घेतल्यावांचून-] एखाद्या. मनुष्याचे देशास, गांवास, किंवा कुळास वगैरे [ अनुलक्षून ] अब्रू घेण्याजोगे शब्द बोलणें, किंवा त्यावर कांहीं दुर्गुणाचा आक्षेप करणे, यास प्रथम प्रतीची [ सर्वांत कमी प्रतीची ] शिवीगाळ असें. ह्मटले आहे. बहिणीशीं, किंवा आईशीं, व्यभिचारसंबंधाचा दोषारोप करणें, किंवा उपपातक केल्याचा दोषारोप करणे यास शास्त्रवेत्ते दुसऱ्या प्रतीची शिवीगाळ असे ५९९ वी० प० १४४ पृ० १ क० वि०. ६०० वी० प० १४४ पृ० १ ; क० वि० ; व्य० मा ०. ६०१ वी० प० १४४ पृ० १; मि० व्य० प० ६७ पृ० १; क० वि०, व्य०. मा... ६०२ वी० प० १४४ पृ० २.