पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २६१ ५९२ दूर अंतरावर करावी. " बृहस्पति 66 66 " माणसें व जनावरें ज्या रस्त्याने कोणताही प्रतिबंध झाल्यावांचून जातात येतात त्या रस्त्यास 'संसरण' ( राजमार्ग ) असें ह्मण- तात. त्या रस्त्यास कोणीही प्रतिबंध करूं नये. ११५९३ नारद चतुष्पथ ( मोठा रस्ता ), देवस्थानसंबंधी जागा; व राजमार्ग यांवर, मैल टाकण्याची जागा, खांच, पाण्याचा नळ, किंवा गटार ( सांचलेलं पाणी जाण्याचा मार्ग ) करून किंवा त्यांवर घराच्या पावळ्या आणून कोणी त्यांस प्रतिबंध करू नये. १९३ कात्यायन ज्या रस्त्यानें कांहीं एक प्रतिबंधावांचून रात्रंदिवस लोक जातात त्यास ' चतुष्पथ' ह्मणतात; आणि जो रस्ता ठरविलेले वेळेस मात्र खुला राहातो त्यास राजमार्ग ह्मणावें. "५९४ बृहस्पति " जो माणूस तेथें ( रस्त्यांत ) केरकचरा बुद्धिपुरस्सर टाकील, खांच खणील, झाडें लावील, बुद्धिपूर्वक शौचास बसेल, त्यास एक माषक ( एक मासाभर तांत्रें ) दंड केला पाहिजे. १५९२ मनु ("अ०९ श्लो० २८२ ) " निरुपाय झालेला असल्यावांचून जो माणूस राजमार्गावर शौचास बसेल त्यास दोन कार्षापण ( एक रुपया ) दंड केला पाहिजे व त्याजकडून तो मल तत्काळ दूर करनिला पाहिजे. १५९५ कात्यायन " तलाव, बाग, व तीर्थ, यांत नरक टाकून दूषित करील त्याजकडून तो मल दूर करवून त्यास स्वल्प दंड केला पाहिजे. "५९६ याज्ञवल्क्य (व्य० श्लो० १५५ ) “ जमिनीच्या सीमेच्या खुणा नाहींशा करून टाकल्याबद्दल, सीमेच्या बाहेरील जमीन नांगरण्याबद्दल, व [ हक्क नसतां ] जमीन बळकावण्याबद्दल दंड [ अनुक्रमानें ] अगदी थोडा, अत्यंत भारी, आणि मध्यम प्रतीचा [ असे सांगितलेले आहेत ]. १५९६ मनु ( अ० ८ श्लो० २६४ ) " जो कोणी [ दुसऱ्याचें ] घर, तलाव, बाग, किंवा शेत [ यांचा कबजा धन्यास ] भीति घालून बळकावील तो पांचशे • पणांचे दंडास पात्र होईल; परंतु अज्ञानानें तशी गोष्ट होईल, तर दंड दोन पण. १,५९७ कात्यायन " दोन शेतांचे हद्दींचे दरम्यान झालेल्या झाडांची फुलें व फळें यांवर दोन्ही शेतांचे धन्यांची सामयिक मालकी ठरवावी. १५९८ तोच स्मृतिकार “ परंतु एकाचे शेतांतील झाडांच्या फांद्या दुसऱ्याचे शेतावर पसरल्या असल्यास ज्याचे शेतांत झाडें तो त्यांचा मालक असें समजलें जाईल. ११५९८ याज्ञवल्क्य (व्य० श्लो १९७) “ जमिनीचे मालकास कळविल्यावांचून त्याचे शेताभोंवतीं कोणी दुसऱ्याने बांध घात. ५९३ वी० प० १४३ पृ० २; क० वि०; व्य० मा ०. ५९४ वी० प० १४३ पृ० १. • ५९५ वी० प० १४३ पृ० २; क० वि० ; व्य० मा ०. ५९६ वी० प० १४३ पृ० २; क० वि०. ५९७ वी० प० १४३ पृ० २; ध्य० मा० . ५९८ वी० प० १४४ पृ० १ ; व्य० मा० .