पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठीय २५३ अधिकार आहे. परंतु भा दिल्यावांचून किंवा करार केल्यावांचून कोणी दुसऱ्याचे जमिनीवर घर बांधून राहील, तर त्यानें घर सोडून जातेवेळेस छप्पर, लांकूड, विटा वगैरे जें घराचें सामान असेल तें सर्व जमिनीचे धन्यास [ जाग्यांचे मालकास ] दिलें पा- हिजे." ' स्तोमः ' ह्मणजे भाडें (वेतनादान). "रोजमुरा न दर्णे याबद्दलचें प्रक ५५४ रण समाप्त. कायम झालेले लौकिक ठराव मोडणें. ( संविद्वयतिक्रम. ) 6 १ 66 नारद “ पाखंडी लोकांमध्ये (वेदमार्ग सोडून चालणारे लोकांत ), आणि नगर ( वेदास अनुसरून वागणारे ) लोकांमध्ये वगैरे कायम असलेले स्थितीस समय ( वहिवाट ) असें ह्मणतात. अशा प्रकारच्या समयाचें ( वहिवाटीचें ) उल्लंघन न क रणें ही एक व्यवहारशास्त्राची बाब होय. "५५५ ' पाखंडिन: ' ह्मणजे वेदोक्त धर्म- मार्गास सोडून चालणारे व्यापारधंदा वगैरें करणारे लोक. ‘नैगमाः ' ह्मणजे जे वेदोक्त धर्माच्या विरुद्ध वागत नाहींत ते. 'आदि ' ( ह्मणजे वगैरे) असा शब्द स्मृतीत आहे, तेणेंकरून तीन वेद जाणते समजावयाचे. यासंबंधानें राजाचें कर्तव्य काय हें बृहस्पति सांगतो वेद जाणणारे ब्राह्मणांस, श्रोत्रियांस ( वेदाध्यापन करणारे विद्वानांस ) व अग्निहोत्र्यांस ( तीन अग्नि स्थापित करणारांस ) मिळवून ( एकत्र बोलावून आणून ) त्यांजकडून राजानें [ स्वराज्यांत ] वसति करवावी; व त्यांचे चरितार्थासाठी नेमणुकी त्यांस घरें व जमिनी द्याव्या, [ व त्याबद्दल सनदापत्रे वगैरे ] लेख आपल्या आज्ञेने करवून देऊन, जमिनीवरील व इतर कोणत्याही उत्पन्नावरील कर त्यांपासून घेऊं नये. " “अनाच्छेद्यकराः ' ह्मणजे त्या जमिनी व घरें, कीं ज्यावर कर द्यावयाचा नाहीं. ' मुक्तभाव्याः ' ह्मणजे अशा जमिनी इत्यादि, की ज्यांवरील उत्पन्नाचे हिश्शाचा कर देण्याचें माफ केलेले आहे. त्या श्रोत्रियादिकांचें कर्तव्य कोणतें तें याज्ञ- वल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १८६ ) स्वधर्माशीं ज्यांचा विरोध नाहीं असे जे सामायिक धर्म ( परंपरागत रीतीभाती, आचार, व वहिवाटी यांचेसंबंधाचे नियम ) अ- ( ५५६ करून द्याव्या. ५५७ ५५४ वी० प० १२९ पृ० २; क० वि०. ५५५ वी० प० १३० पृ० २ ; मि० व्य० प० ७४८० १; क० वि० ; व्य० मा ०. ५५६ ' गृहभूमयः ' अर्से वचनांत आहे; परंतु येथे 'भूमी: ' अशी कर्माणि द्वितीया समजा- वयाची.. ५५७ वी० प० १३० पृ २; व्य० मा०. येथें 'मुक्तभाव्याच ' असा पाठ आहे, परंतु वीरमित्रोद- यांत ' युक्तभव्यश्च ' असा पाठभेद आहे.