पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५२ व्यवहारमयूख. " बाहेर निघण्याचे शुभ प्रसंगी जो नोकर धन्यास अडथळा करीत त्याजकडून ठरविलेले मजुरीचे दुप्पट दंड घ्यावा; निवण्याचे ठरल्यानंतर मध्ये मार्गावर जर तो अडथळा घा लील, तर मजुरीचा सातवा हिस्सा त्यास दंड करावा; आणि रस्त्यांत मधूनच सोडून जाईल तर चौथा हिस्सा दंड करावी. १५४८ वृद्धमन “ कोणी व्यापारी [ विवक्षित ] टि- काणी जाण्याचे ठरावानें नोकर ठेवून त्यास बरोबर घेऊन जाईल आणि मध्येच आपला माल विकून नोकरास दूर करील, तर त्यास अर्धा रोजमुरा मिळालाच पाहिजे. १५४९ 66 ११५५० कात्यायन “ आणि रस्त्यावरच जर माल थांबविला गेला [ किंवा जप्त झा- ला ] अथवा चोरांनी नेला, तर नोकरानें जितकी मजल केली असेल, त्या प्रमाणानें त्यास रोजमुरा दिला पाहिजे. थकलेले किंवा आजारी चाकराची योग्य तजवीज एकादे खेडेगावांत [ राहून ] तीन दिवसपावेतों न करतां त्यास जो धनी मध्येच सोडून देईल त्या [ धन्यास ] कनिष्ठ प्रतीचा दंड केला पाहिजे. आसिध्येत ' ह्मणजे राजाज्ञेनें जप्त होईल. बृहस्पति " आपल्या धन्याच्या हितासाठीं व त्या- च्या आज्ञेनें चाकराने कांहीं अयोग्य कृत्य केल्यास तो अपराध धन्याचा [ स- मजावयाचा ]. नोकर आपले काम करीत असून त्याचा रोजमुरा धन्यानें न दिल्यास राजाने धन्याकडून देववावा, व त्यास ( धन्यास ) त्या मानानें दंड करावा. नारद " मालाच्या धन्यानें ( व्यापाऱ्यानें ) गाड्या किंवा जनावरें भाड्यानें करून त्यांस दिलें नाहीं, तर ठरविलेले भाड्याचा चवथा हिस्सा त्याजक- डून देववावा; परंतु जर अर्ध्याच रस्त्यावर तो त्यांस सोडील, तर पुरें भाडें देववावें. " यानं ह्मणने गाडी वगैरे. ' वाहनं ' ह्मणजे घोडा वगैरे ज्यावर प्रत्यक्ष स्वारी केली जाते. कात्यायन "हत्ती, घोडे, बैल, गाढवें, उठें, किंवा अंशी दुसरीं [ वाहनें व- गैरे ] कोणी मनुष्याने भाड्यानें करून त्यानें त्यांचा उपयोग केला, आणि भाड़ें दिलें ना- हीं, तर ती जनावरें धन्याचे स्वाधीन करीपावेतों त्याजकडून भाडें देवविलें जाईल. १५५३ नारद “ दुसऱ्याची जागा भाड्याने घेऊन तीवर घर बांधून त्यांत राहणाऱ्या माण- सानें घर सोडून जातेवेळेस त्यानें छप्पर, लांकूड, विटा वगैरे घेऊन गेल्यास त्यास अ- १,५५१ ५४९ वी० प० १२९ पृ० २. १,५५२ ५५० वी० प० १२९ पृ० २ ; क० वि०. या कात्यायनवचनाचे प्रारंभी ' यथा च पथितद्भांडं ' असा पाठ आहे, परंतु वीरमित्रोदय व कमलाकर यांत ' यदा च पथितद्भांडं ' असा पाठभेद आहे. ५५१ बी० प० १३० पृ० १; क० वि०. ५५२ वी० प० १२९ पृ० २; व्य० मा०. ५५३ वी० प० १२९ पृ० २; क० वि०; व्य० मा० .