पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

, नीलकंठीय 66 ५४५ २५:१ काच्छादभूतः खाण्यास भात व वस्त्र ज्यास दिलें तो. नारद “ कबूल केलेलें काम कोणी माणूस न करील तर, त्यास [ ठरविलेला ] रोजमुरा देऊन तें काम त्याजकडून जब- रदस्तीनें करवावें ; रोजमुरा घेऊन [ कबूल केलेलें ] काम करणार नाहीं, तर त्याजकडुन रोजमुऱ्याचे दुप्पट रक्कम देववावी. १५४३ मनु (अ० ८ श्लो० २१५ ) " [ अन्नवस्त्र.. देऊन वगैरे. ] पाळलेला नोकर आजारी नसतां उद्धटपणानें सांगितल्याप्रमाणे काम करणार नाहीं तर त्यास आठ कृष्णल (गुंज) दंड करावा; शिवाय त्याचा रोजमुरा देऊं नये. १५४४ तोच स्मृतिकार ( अ० ८ श्लो० २१६, २१७) काम करण्याचें कबूल करणा- रानें, तो आजारी असो किंवा नसो, कबूल केलेलें काम न करविल्यास [ किंवा ] तें पुर्रे क- करण्याचें थोडेंसें जरी राहिलें असेल तरी, त्यास रोजमुरा देऊं नये. परंतु तो आजारी असल्यास कबूल केलेलें काम त्याची प्रकृति नीट झाल्यावर पाहिने तर त्यानें करावें आणि पुष्कळ वेळ [ दरम्यान ] गेला असेल तरी त्यास त्याचा [ मूळचा ठरलेला ] सेजमुरा मिळावा. १९४६ [ याचप्रमाणें ] विष्णु “ ठरविलेली पुरी मुदत भरण्याचे पूर्वीच जो नोकर काम सोडून देईल, त्याचा सर्व रोजमुरा बुडेल ; शिवाय त्यानें राजास शंभर पण दंड द्यावा. १४७० तोच स्मृतिकार पुनः ह्मणतो " ठरविलेली मुदत भरण्याचे पूर्वी जर धन्यानें नोकरास कामावरून काढलें तर, चाकराचे कारणानें त्यास दूर केलेले नस- ल्यास, धन्यानें नोकरास सर्व रोजमुरा द्यावा; शिवाय शंभर पण राजास दंड द्यावा. १५४८ वृद्धमनु “ चाकराचे दुर्लक्ष्यामुळें त्याजकडून जी नुकसाबी झाली असेल, तिची भर- स्क्कम त्याजकडून भरून देववावी; त्याचे आकसानें नुकसानी झाली असल्यास दुप्पट रक्कम ; परंतु चोरांनी चोरून नेल्याबद्दलची, किंवा आगीनें जळलेल्याबद्दलची, किंवा पाण्याने वाहून गेल्याबद्दलची नुकसानी त्याजकडून देवविण्याची नाहीं. १,५४८ द्रोह : ? ह्यणजे आकस, वैर. ' ऊढं ' ह्मणजे नेलेले. याज्ञवल्क्य (व्य० श्लो० १९७, १९८) 6 ५४३ वी० प० १२८ पृ० २ ; मि० व्य० प० ७४ पृ० २ ; क० वि०; व्य० मा०. ' भृतिमाप्नु- यात्' असा येथे पाठ आहे, परंतु वीरमित्र दियांत 'भृतिमावहेत्' असा पाठभेद आहे. ५४४ वी० प० १२८ पृ० २ मि० व्य० प० ७५ पृ० २; या मनुवचनाचे आरंभी 'भृतोऽ- नार्तो' असा पाठ आहे; परंतु मिताक्षरेंत 'भृत्योऽनार्तो' असा पाठभेद आहे.... ५४५ या मनुवचनांत 'सुदीर्घस्यापि कालस्यस्वं ' असा पाठ आहे; परंतु मिताक्षरेंत ' सदीर्घस्या:-- पि. कालस्यस्वं' असा. पाठभेद आहे. ५४६ वी० प० १२८ पृ० २ : मि० व्य० प० ७५ पृ. २. ५४७ वी० प० १२८ पृ० २. ५४८ वी० प० १२९ पृ० १.