पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५० व्यवहारमयूख. असें इच्छील, तर त्यानें पाण्याने भरलेली घागर त्या दासाचे खांद्यावरून घेऊन भरलेली असतांच फोडावी, व अक्षता, फुले यांसह पाणी घेऊन दासाचे डोक्यावर शिंपडावें; आणि तीन वेळ ‘तूं आतां दास नाहींस' असें ह्मणून त्या माणसास पूर्वेस तोंड करून जा ह्मणून सांगावें. त्या दिवसापसून तो माणूस आपल्या धन्याच्या अनुग्रहाने पाळलेला असा तो झाला असें समजावें; व त्यानें तयार केलेले अन्न भक्षणास योग्य होय. त्याने दिलेलें दान घेण्यास हरकत नाहीं, व मोठ्या लोकांस तो मान्य होतो असें समजावें. " कात्यायन " जी स्त्री दासी नव्हे तो दासाची बायको झाल्यास दासी होते, कारण तिचा नवरा तिचा स्वामी होय, व तो आपल्या धन्याचे स्वाधीन. जी मालमत्ता दासाजवळ असते तीवर धन्याचें स्वामित्व आहे, असें सांगितलेलें आहे. " कराराप्रमाणें नोकरी न करणें हें प्रकरण समाप्त. ५३९ चाकरीचा मुशाहिरा न देणें (वेतनादानम् . ) ११५४० 492 नारद " टेवलेले नोकरास वेतन ( मुशाहिरा ) देणें व न देणें या संबंधाचे नि- यम आतां सांगतों. या प्रकरणास व्यवहारशास्त्रांत (दिवाणी काम चालविण्याचे नि- - यमांत ) ' वेतनादान" असें ह्मणतात. याज्ञवल्क्य ( व्य ० श्लो० १९४ ) " काय मजुरी द्यावयाची याचा ठराव केल्यावांचून जर कोणी माणूस दुसऱ्यास कोणत्याही जातीचे व्यापारांत, पशु किंवा धान्य यासंबंधाचे धंद्यांत, कामास लावील, तर त्या धंद्यांत जो धन्याला फायदा होईल त्याचा दशांश [ कामास लाविलेले माणसास. ] धन्याकडून राजानें देवविला पाहिजे. १५४१ हा नियम थोड्या श्रमाच्या कामाचे संबंधाचा आहे असें समजावें. मोठे श्रमाचें काम असल्यास त्याविषयीं बृहस्पति सांगतो " नांगर हांकणाराने [ धान्याचा ] तिसरा किंवा पांचवा हिस्सा घ्या- का; त्या नांगऱ्यास अन्नवस्त्र दिलें असल्यास, त्यानें पांचवा हिस्सा घ्यावा; अन्नवस्त्र दिलें नसल्यास त्यानें उत्पन्नाचा ( पिकाचा ) तिसरा हिस्सा घ्यावा. ५३८ मि० व्य० प० ७३ पृ० १, वी० प० १२७ पृ० १; क० वि० व्य० मा०. ५३९ वी० प० १२७ पृ० २ ; क० वि० . ५४०मि० व्य० प० ७४. पृ० २; वी० प० १२७ पृ० २; क० वि०: व्य० मा ०. ५४१ वी० प० १२८ पृ० १; क० वि०. ५४२ बी० प० १२० पृ० १; क० वि०, व्य० मा० . 199 ५४२ 6 भ-