पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २४९ विकून दास्यत्व घेतो तो सर्व प्रकारच्या दासांत नीच होय. त्याची दास्यापासून सुटका नाहीं. धन्यावर प्राणसंकट आलें असतां त्यांतून त्यास या दासांतून जो दास सोडवील त्याला दास्यापासून मुक्त करून पुत्राप्रमाणें [ जिनगीचा ] हिस्सा देववावा. " ५३३ याज्ञवल्क्य (अ० २ श्लो० १८३ ) " संन्याशाचा आश्रम स्वीकारून त्यापासून जो पतित होईल तो जन्मभर राजाचा गुलाम होईल. "*३४ नारद " दुष्काळांत अन्न घालून पोसला गेला ह्मणून जो झालेला त्यानें [ धन्यास ] बैलांची एक जोडी दिल्यास त्यास मुक्त करावें. गहाण ह्मणून जो गुलाम ठेवलेला असेल त्यास त्याचे धन्याने कर्ज फेडलें ह्मणजे परत दिले पाहिजे. व्याजासुद्धां पैशाची फेड केल्यास ऋणकोस गुलामगिरींतून मुक्त केलें पाहिजे. ‘ मी तुझा आहें ’ असें ह्मणून जो गुलाम झालेला असेल, लढाईंत केलेला गुलाम, व पणांत जिंकून घेतलेला गुलाम यांनीं कांहीं काम करण्यालायक मोबदला गुलाम दि- ल्यास त्यांस सोडून दिलें जातें. कांहीं विवक्षित काळापावेतोंच जो गुलाम झालेला असेल त्यास मुदत भरली ह्मणजे सोडलें पाहिजे. केवळ उदरनिर्वाह होण्यासाठी झालेले गुलामानें अन्न घेण्याचे बंद होतांच तो मुक्त होतो. वडवेनें ( दासीनें ) मोहिलेला दास तिच्याशी संबंध सोडतांच मुक्त होतो " " ' प्रतिशीर्षः ' ह्मणजे बदली. ' वडवा' ह्मणजे दासी. याशवल्क्य (व्य० श्लो० १८२) “ जबरदस्तीने केलेला गुलाम व चोरानें विकल्यानें झालेला गुलाम यांस गुलामगिरीपासून मुक्त करावें. "५३ नारद " जो स्वतंत्र नाहीं ( ह्मणजे दुसन्याचा गुलाम असेल) तो ' मी तुझा आहें ' असें ह्मणून आपल्याच इच्छेनें दुसऱ्याचे स्वाधीन झाल्यास त्यास इष्ट प्राप्त होत नाहीं; कारण पूर्वीचा धनी त्यास परत घेऊं शकेल. " 'अस्वतंत्र: ' ह्मणजे दुसऱ्याचा गुलाम. या प्रकरणांत दास शब्द जरी पुल्लिंगवाचक आहे, तरी पुल्लिंगच घेण्याचा नियम नाहीं; ह्मणून या सर्व प्रकरणांत जे नियम सांगितलेले आहेतं ते सर्व दासीसही लागू आहेत असें समजावयाचें. ५३७ दास्यापासून दासीस. मुक्त होण्याचें कारण कात्यायन सांगतो “ आपल्या दासीशीं कोणी पुरुष गमन करील व त्यापासून चांगलें अपत्य होईल, तर तिच्या अपत्यासुद्धां तीस दास्यापासून मुक्त करावें. " " ' बीजं ' ह्मणजे गुणवान् अपत्य. नारद “ कोणी पुरुष अंतःकरणांत संतुष्ट होऊन आपल्या दासास मुक्त करावें, ५३३ मि० व्य० प० ७२ पृ० २; बी० प० १२६ पृ० १; क० वि०. ५३४ वी० प० १२६ पृ० २; क० वि०; व्य० मा०. ५३५ बी० प० १२६ पृ० २; क० वि०. ५३६ वी० प० १२७ पृ० २; क० वि०. ५३७ वी० प० १२७ व्य० मा० पृ० १; ध्य० मा०. ३२