पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ व्यवहारमयूख. " नये." ५२९ मनु (अ० ८ श्लो० ४११ ) “ क्षत्रिय वर्णाच्या आणि वैश्य वर्णाच्या पुरुषांस उदरनिर्वाहाचें संकट पडल्यास त्यांजकडून त्यांचे वर्णास उचित असें एखादें काम सुखासमाधानानें करवून त्यांचा चरितार्थ ब्राह्मणाने चालवावा. 'स्वामिकर्म' ह्मणजे त्यांचे वर्णास योग्य असें एखादें स्वामिकार्य. कात्यायन " जो ब्राह्मणजातीचे स्त्रीस विकील व जो विकत घेईल त्या दोघांस राजाने शिक्षा करून त्यांनी केलेले सर्व रद्द करावें. कोणी कुलीन स्त्री संरक्षण व्हावें ह्मणून कोणा पुरुषाकडे जाईल व तिला कामवा- सनेनें तो दासी करून ठेवील, किंवा [ त्याच का साठीं ] दुसऱ्याकडे तिला पाठवील, तर त्यास शिक्षा झाली पाहिजे ; व त्याचें सर्व कृत्यं रद्द केलें पाहिजे. लहान मुलासा- ठ ठेवलेले दाईस किंवा दाई नसलेले इतर स्त्रीस, किंवा आपल्या पदरच्या नोकराचे स्त्रीस दासीप्रमाणें जो कोणी वागवील त्यापासून कनिष्ठ दंड घेतला पाहिजे. १५३१ विष्णु “ जो कोणी सर्वात उंच वर्णाच्या मनुष्यास दासाचे कामास लावील त्यास उ- त्तम साहसाचा (भारींत भारी ) दंड केला पाहिजे. १५३१ कात्यायन " जो पुरुष संकटा- वस्थेंत नसून, व दासीचें पोषण करण्याचे सामर्थ्य असतां, आक्रोश करणाऱ्या ( ह्मणजे विकून घेण्यास न इच्छिणाऱ्या ) दासीस विकण्यास जाईल त्यास स्वल्प दंड करावा. ,,५३२ दासांचे प्रकार नारद सांगतो " घरांत जन्मलेला, विकत घेतलेला, [ देणगी - णून ] दिला गेलेला, वारशांत आलेला, संकट काळांत (दुष्काळांत ) पोसलेला, तसेंच पूर्वीचे धन्यानें गहाण ह्मणून ठेव ेला, भारी कर्जातून मुक्त केलेला, लढाईंत गुलाम केलेला, पणांत जिंकून घेतलेला, 'मी तुझा आहें ' असें ह्मणून स्वतःच आलेला, चतुर्थाश्रमापासून भ्रष्ट झाल्यामुळे झालेला, कांहीं विवक्षित वेळेपावेतों गुलाम झालेला, [केवळ ] उदरनिर्वाहासाठीं झालेला गुलाम, वडवेस ( घरांतील दासीस) भुलून तिच्याशी लग्न केल्यानें झालेला गुलाम, आणि ज्याने स्वतःस विकलें तो,. याप्रमाणें पंधरा प्रकारचे गुलाम कायद्यानें मान्य झालेले आहेत. यापैकी पहिल्या चार प्रकारचे गुलाम यांस वंशपरंपरेनें दास्य प्राप्त झालेले असल्यामुळे त्यांचे धन्याचे इच्छेनें मात्र ते दास्यांतून मुक्त होऊं शकतात. स्वतंत्र असून जो अधम पुरुष आपणास दुसन्यास ५२९ वी० प० १२५ पृ० २. ५३० बी० प० १६० पृ० १; व्य० मा० . येथे 'स्वामिकर्म तु कारयेत् ' असा पाठ आहे. 'स्वामि- कर्माणि कारयन्' असा पाठ कुलकभट्टास संमत आहे. 'स्वामिकर्माणि कारयन् ' असा वीरमित्रो- बयांत पाठ आहे. ५३१ वी० प० १९७ पृ० २; क० वि०. ५३२ बी० प० १२७ पृ० २.