पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ व्यवहारमयूख. वगैरेचा अर्थ, चुकीनें होणारा परिणाम टाळण्यासाठी दिलेला लांच. " कांहीं कार्य- भाग साधण्यासाठों देऊ केलेला लांच तो कार्यभाग सिद्धीस गेला तरी देखील कधीं देऊ नये. पण जर लांच पूर्वीच प्रत्यक्ष दिला गेला असेल तर तो जबरीने परत देवविला पाहिजे; शिवाय लांचाचे अकरापट दंड बसवावा असें गार्ग्य ऋषीच्या मतास अनुसरणा- यांचें मत आहे. "५१९. तोच स्मृतिकार लांचाचें स्वरूप सांगतो “चोर, साहस करणारा ( ह्मणजे सामान्य प्रतीचा गुन्हेगार ), स्वधर्माप्रमाणं न चालणारा, व अन्याचे स्त्रीशी कु- कर्म करणारा, यांचे संबंधाची खबर किंवा माहिती छपवून ठेवण्यासाठीं जें काय घेतलें असेल तें, व दुष्ट आचरणाचे मनुष्यास छपवून ठेवण्यासाठी, किंवा खोटी साक्ष देऊन तुझी नाचक्की करोन अशी कोणास दहशत घालून त्यापासून जें काय घेतलें असेल तं, त्यास लांच ह्मणावें. ११५३० मनु (अ० ८ श्लो० १६५ ) “तारण, विक्री, देणगी, किंवा प्रतिग्रह, किंवा कोणत्याही प्रकारचे कामांत कपट झालेले आहे अतें [ न्यायाधिशाचे ] नजरेस येईल तेव्हां त्यानें तें सर्व कृत्य रद्द करावे. १५२० 'योग: ' ह्मणजे कपट. याचा अर्थ असा कीं, कोणत्याही इतर प्रकरणांत कपटाचें स्वरूप दृष्टीस पडल्यास तें सर्व फिरवावे. कात्यायन " प्रकृति चांगली असतां, किंवा बिघडलेली असतां, धर्मकृत्यासाठी कांहीं देणगी कबूल केली असून कबूल करणारा ती देण्यापूर्वी मरेल तर ती त्याचे पुत्राकडून देवविलीच पाहिजे, याविषयीं कांहीं एक शंका नाहीं. १,५१९ या विषयावर सविस्तर वि- चार आमचे वडिलांनीं राचलेले द्वैतनिर्णय ग्रंथांत पहावा. ' दत्ताप्रदानिक' प्रकरण समाप्त. नोकरीचा करार मोडणें. (अभ्युपेत्याशुश्रूषा. ) नारद " नोकरी करण्याबद्दल करार केल्याप्रमाणें जर १,५२०० नोकरी केली नाहीं तर त्या कृत्यास व्यवहारशास्त्रांत 'नोकरीचा करार मोडणें असें ह्यटलेलें आहे. नोकर तीन प्रकारचे आहेत असें बृहस्पति ह्मणतो: “ ( १ ) आयुधी ( हत्यारबंद शिपायी) हा सर्वांत उच्च प्रतीचा नोकर ; ( २ ) शेतकरी, हा मध्यम प्रतीचा; व (३) हमाल, हा अगदी कमी प्रतीचा समजलेला आहे ; ( ३ ) व त्याचप्रमाणे घरगुती काम. ५२० वी० प० १२३ पृ० २ ; व्य० मा० . ५२१ मि० व्य ० प० ७२ पृ० २; वी० प० १२३ पृ० २; क० वि०; व्य० मा० ..