पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ ५१० व्यवहारमयूख. निषेधासारखा स्वतःसिद्धनिषेधाचाच अनुवाद आहे ( हा प्राप्तिपूर्वक निषेध नाहीं ). याव रून “ कुटुंबांतील जिनगीचें नुकसान केल्यावांचून सर्वस्व देतां येते; मात्र पुत्र व पत्नी यांस देतां येत नाहीं " असा जो दानास पुत्रपत्नींचा अपवाद याज्ञवल्क्यानें ( व्य ० श्लो० १७५) सांगितलेला आहे तो सुसंगत होतो. स्वत्वविचारप्रकरणांत, पुत्र, पत्नींवर नाहीं हें पूर्वी सांगितलेलेच आहे. पुत्र, पत्नींचें दान केल्यास तें दान कायदेशीर होणार नाही इतकेंच नव्हे, परंतु त्याबद्दल [ देणारानें ] प्रायश्चित्त घेतलें पाहिजे. पुत्रादिदानाविषय आरंभ करून दक्ष सांगतो “ यांचे (स्त्रीपुत्रांचे) दान करणारा मूर्ख होय. त्यानें प्रायश्चित्त केलें पाहि- जे. १,५११ मनु " जें देण्यास अयोग्य तें जो घेईल व जो देईल त्या दोघांसही चोराची शिक्षा द्यावी; शिवाय त्या दोघांस उत्तम साहस दंड करावा. १,५१२ देण्यास योग्य काय हैं बृहस्पतीनें सांगितलें आहे " कुटुंबास पुरून उरेल तें अन्न व वस्त्र [ दान ] द्यावें. " दिलेच पाहिजे असें कोणतें तें कात्यायन सांगतो णास में देऊं केलेलें असेल तें त्यानें न दिल्यास शिवाय त्यास कनिष्ठ प्रतीचा दंड करावा. ५१४ " ५१३ " आपल्या इच्छेनें ज्यानें ब्राह्म- त्याजकडून तें कर्जाप्रमाणे देववावें; गौतम यास [ अपवाद सांगतो ] ५३५ 71 “ अधर्माने चालणाऱ्यास कबूल केलेलेंही दान देऊं नये. वृत्तीचें (उदरनि- र्वाहासाठीं जें कायमचें उत्पन्न असतें त्याचें ) दान किंवा विक्री करूं नये ह्मणून व्यास ५१६ सांगतो “ जे जन्मास आले आहेत व यावयाचे आहेत आणि जे गर्भवासांत आहेत सर्व निर्वाहाचे साधन इच्छितात; [ ह्मणून ] वृत्तीचें दान किंवा वृत्तीची विक्री करूं नये. " दान पक्के कोणते व अपुरें कोणतें यांतील भेद नारद सांगतो " पक्के दान सात प्रकारचें; आणि अपुरें दान सोळा प्रकारचें सांगितलेलें आहे; दानसं- बंधीं नियम जाणणारांचें ह्मणणें असें आहे कीं, ( १ ) विकत घेतलेले जिनसाची किंमत, ( २ ) रोजमुरा, (३) [ कवि किंवा गायक वगैरेंवर ] खुष होऊन दि- लेली देणगी, ( ४ ) स्वाभाविक प्रेमाने दिलेली देणगी, (५) किंवा उपकार स्मरून दिलेली देणगी, ( ६ ) लग्नाचे वेळेस [ नवरीचे भावास ] दिलेली देणगी, आणि (७) ५१० व्य० मा०. ५१ वी० प० १२१ पृ० २. • ५१२ बी० प० १२१ पृ० २ ; अनेक मनुस्मृतीचे पुस्तकांत में वचन सांपडत नाहीं, तरी वीरमि- त्रोदयादि ग्रंथांवरून हें मनुवचनंच असें निश्चित होतें. ५१३ वी० प० १२१ पृ० २; क० वि० ; व्य० मा०. ५१४ वी० प० १२२ पृ० २ ; क० वि० ; व्य० मा ०. ५१५ क० वि०. ५१६ बी० प० १२१ पृ० १; क० वि० ; ध्य० मा० .