पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ व्यवहारमयूख. भागीदारीविषयीं. (संभूयसमुत्थानम् . ) १,५०२ याज्ञवल्क्य नारद " जेथें व्यापारी किंवा इतर एकत्र मिळून सामयिक व्यापार करतात त्यास भागीदारीचा व्यापार असें व्यवहारशास्त्रांत झगतात. ' ,५०१ बृहस्पति " जं कांहीं धन किंवा जिनगी एक मनुष्य अनेकांचे संमतीने देतो किंवा हरकोणताही व्य वहार (व्यापारकाम ) करवितो तें कृत्य त्या सर्वांचे ( सर्वांनी मिळून केलेलें ) होय असें समजलें जातें. संशयित गोष्टींचे बाबतीत किंवा लवाडीचे प्रकरणी ते सर्व आपा- पसांत (परस्परांचे संबंधानें ) साक्ष देण्यास व निकाल करण्यास योग्य आहेत असें ठरविलेलें आहे; मात्र परस्परांत वैरभाव नसावा. त्यांचेपैकी कोणी विक्रांत किंवा खरेदीत कपट केल्याचें उवडकीस आल्यास त्यास शपथ देऊन त्याची चौकशी करण्याचाही (त्यास अपराधी अनपराधी ठरविण्याचाही ) [ त्यांस अधिकार आहे ]. हर कोणत्याही प्रकारचे तकरारींत हाच नियम लागू [ समजावा ]. ( व्य० श्लो० २६९ - २६० ) " [ भागीदारांपैकी जो कोणी ] वांकड्या रस्त्याने चाल - णारा असेल त्यास नफा न देतां [ इतर भागीदारांनीं ] काढून द्यावें. ज्यास [ कारभार करण्यास ] सामर्थ्य नसेल त्यानें आपल्याबद्दल काम चालविण्यास मुखत्यार नेमावा. भागीदारांनी जी गोष्ट नापसंत केली किंवा करावयाची नाहीं असें ठरविले ती त्यांतील कोणी भागीदार करील किंदा आपल्या हेळसांडपणानें एकंदरीचे व्यापाराचें नुकसान करील तर झालेला तोटा त्यानें भरून दिला पाहिजे. पण जो भागीदार व्यापाराचा माल वगैरे [ चोरांपासून किंवा इतर] संकटांपासून बचावील त्यास [ बक्षीस ह्मणून ] त्या मालाचा वगैरे दहावा हिस्सा मिळाला पाहिजे. १५०३ कात्यायन जर चार प्रकारचे कारागीर मिळून एकाच कामास लाविले ह्मणजे नवीन शिकाऊ, अनुभविक जाणते, कुशल कारागीर, आणि आचार्य ( प्रवीण शिक्षक ), तर सर्वांस मिळून त्यांस मिळालेले पगाराचे किंवा नफ्याचे हिस्से त्यांनी अनुक्रमानें एक, दोन, तीन, चार या मा- बाने द्यावे. 'शिष्यकाः ' ह्मणजे नवशिके विद्यार्थी. 'अभिज्ञा: ' ह्मणजे अनुभ ५०४ विक जाणते. ' कुशलाः ' ह्मणजे दक्ष. 6 आचार्याः ' नवीन क्लृप्ति काढणारे वगैरे. बृहस्पति घर, देवालय, किंवा पायऱ्यांचा पाण्याचा हौद, किंवा धर्मसंबंधाची 66 ५०१ वी० प० ११८ पृ० १ ; क० वि० ; व्य० मा० . ५०२ वी० प० ११८ पृ० २; क० वि०; य० मा० . ५०३ वी० प० ११९ पू० १. ५०४ वी० प० १२० पृ० २; क० वि० ; व्य० मा० .