पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० व्यवहारमयूख. विकणाराचे ठिकाण. नारद "स्त्री, पशु, किंवा जमीन, यांचे उपभोगाविषयीं जशी परवानगी असेल तसाच त्यांचा उपभोग घ्यावा. परवानगविांचून यांचा कोणी भोगवटा केल्यास अशा भोगवट्यापासून झालेले उत्पन्न त्याजकडून देवविले पाहिजे. १४९४ ‘उद्दि ष्टं' ह्मणजे परवानगी दिलेले. 'भुक्तभोगं' ह्मणजे भोगवट्यापासून झालेला नफा किंवा त- दनुसार भाडें. याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० १७३) “ जकातीचे अधिकारी ( जलमार्गा- नें येणारे जाणारे मालावर वगैरे कर घेण्यासाठी नेमलेले ), किंवा रखवालदार, यांस हरवलेली किंवा चोरीस गेलेली वस्तु सांपडेल आणि तीबद्दल एक वर्षाचे आंत मागणें केले जाईल, तर ती धन्याने घ्यावी. त्यापुढें [ राहिल्यास ] ती राजानें ठेवावी; ११४९५ परंतु " ज्या जिनगीचा मालक हजर होत नाहीं अशी जिनगी तीन वर्षीपावेतों जप्त ठेवावी ; तीन वर्षांचे आंत धनी सांपडेल तर त्यानें ती जिनगी घ्यावी. तीन वर्षांपुढे [ धनी न सांपडल्यास ] ती राजानें ठेवावी १४९६ असें मनुवचन (अ० ८ श्लो० ३० ) आहे तें श्रोत्रियाचे (वेदवेत्त्या पुरुषाचे ) मालकीच्या जिनर्गाचे संबंधाचे आहे. तोच स्मृतिकार (अ० ८ श्लो० ३३ ) “ नाहींशी होऊन पुनः सांपडलेले जिनगीचा सहावा, दाहावा, किंवा बारावा हिस्सा सत्पुरुषांचा धर्म स्मरून राजानें ध्यावा."४९७ येथें [अशी व्य- वस्था ] एका वर्षाचे मुदतीचे आंत सर्व जिनगी राजानें परत द्यावी; दुसऱ्या वर्षी बारावा हिस्सा घेऊन बाकी परत द्यावी; तिसऱ्या वर्षी दहावा हिस्सा घ्यावा ; आणि चौथ्या व त्यापुढे, सहावा हिस्सा. मिताक्षरा ग्रंथाप्रमाणे, 'तीन वर्षांपुढे ती [ वस्तु ] राजानें ठे- वावी.' याचा अर्थ त्या मुदतीचे आंत धनी हजर न झाल्यास त्यापुढें खर्च करण्यास रा जास मात्र परवानगी आहे, पण धनी हजर झाल्यास खर्च केली असल्यासही ती परत दिली पाहिजे असा समजावयाचा.. धनी कोठे आहे हे माहीत नसल्यास मात्र हा निय- म लागू. जेव्हां अमुक अमुक जिनगी विसरभोळेपणानें टाकून तो कोठें निघून गेला आहे असा निश्चय असल्यास, ती त्याला तीन वर्षांनंतरही मिळेल. ती खर्चावयास राजालाही अधिकार नाहीं; त्यानें कांहीं हिस्सा मात्र घ्यावयाचा आहे. कोणाचीं उनाड जनावरें सांपडून त्यांस एक दिवस राखणदारानें राखण्याबद्दल त्यास रोजमुरा काय द्यावा याविषयीं याज्ञवल्क्य सांगतो (व्य० श्लो० १७४) जनावर एक खुराचें असल्यास त्याचेबद्दल चार पण, मनुष्याबद्दल पांच पण, प्रत्येक 66 ४९४ वी० प० ११८ ५० १ ; क० वि० ; व्य० मा०. ४९५ वी० प० ११८ पृ० ९. ४९६ वी० प० ११८ पृ० मि० व्य०प० ७० पृ० १ ; क० वि०. ४९७ मि० व्य० प० १७ पृ० १,