पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नीलकंठीय २३९ कायदेशीर आहे हे शात्रीत करण्यास खरेदीदारास सांगावें. खरेदी कायदेशीर शाबीत आहे असें ठरल्यास खरेदीदारास राजानें दोष देऊं नये. हकदारानें प्रथम आपल्या संबंध्यां- चे साक्षीपुराव्यानें जिनगी आपली आहे हें शाबीत करावें; नंतर स्वतःवरचा दोष उड- विण्यासाठी, आपल्या संबंध्यांच्या साक्षीपुराव्याने केलेली खरेदी यथायोग्य आहे हें, खरे- दीदारानें शाबीत करावें. १४९० ११४९३ 6 खरेदीदारान जरी खरेदी स्पष्ट रीतीनें शाबीत केली तरी हरवलेली वस्तु ज्याची असे- ल त्याजकडे ती जाते. याविषयीं मनु ( अ० ८ श्लो० २०२ ) " आतां जर खरेदी- देणारास हजर करवत नसेल व खरेदी उघडपणें ( कायदेशीर ) झाली असें खरेदी घेणारा शाबीत करील, तर या खरेदी घेणारास शिक्षेत्रांचून राजानें सोडून द्यावे; आणि हरवलेली वस्तु ज्याची असेल त्याजकडे ती जाईल. 'अनाहार्य ' ह्मणजे हजर करवत नसेल तर. याचा अर्थ असा कीं, उघड रीतीनें विक्री झाली असें शाबीत होईल तर विक्री योग्य होते. कात्यायन " प्रतिवादीनें खरेदी देणारास हजर न केल्यास, आणि उघड रीतीनें खरेदी झाली हेंही शाबीत न केल्यास, दाव्यांतील वस्तु दावा करणान्यास द्यावी आणि खरेदी घेणाराकडून दंड देववावा. बृहस्पति " राजाचे अधिकाऱ्यांचे देखत किंवा त्यांस माहीत होई अशा रीतीनें व्यापारी लोकांचे मंडळीपासून खरेदी केली अस ल्यास, किंवा ज्याचें ठिकाण माहीत नाहीं अशा माणसापासून खरेदी केलेली असेल तेव्हां, किंवा खरेदी देणारा मेला असल्यास, खरेदी करणाऱ्याने दिलेले किमतीची निमे किमत देऊन मालकानें वस्तु परत घ्यावी. कायद्याचे नियमास्तव अशा ठिकाणी उभय पक्षकारांनीही अर्धा अर्धा तोटा सोसावा. १४९३ मरीचि “ त्याचे ठिकाण माहीत नसल्याकारणानें जेथें विकंणाराचा थांग लागत नाहीं तेथें ज्याची वस्तु गेली त्यानें व ज्यानें खरेदी- घेतली त्यानें या दोघांनी तोटा सारखा सोसावा. १४९२ निवेश: ' ह्मणजे ११.४९२

४९० मि० व्य० प० ६९ पृ० २ ; वी० प० ११७ पृ० १ ; व्य० मा ०; क० वि० 'असमाहार्य ' येथपासून दोन श्लोक वीरमित्रोदयांत नारदमतूंची वचनें ह्मणून सांगितले आहे. पहिला श्लोक मनुवचन. अर्से मिताक्षरा ग्रंथांत आहे; व कमलाकरानें हैं बृहस्पतिवचन ह्मणून झटलेलें आहे. ४९१ वी० प० १११ पृ० २ ; क० वि० ; व्य० मा० ; येथें ' अथ मूलमनाहार्य प्रकाशक्रयशोधि- तम्' असा पाठ आहे, परंतु 'अथ मूलमनाहार्यप्रकाशक्रयशोधितः' असी पाठ कुलूकभट्ट यास संमत आहे; पण माधव व वीरमित्रोदय यांत तर ' अथ मूलमनाहार्यम् ' असा पाठ आहे. ४९२ वी० प० ११७ पृ० २ ; क० वि०. ४९३ वी० प० ११७ पृ० २; व्य० मा ; माधव व वीरमित्रोदय यांत हीं वचनें कात्यायनाची असे पटलेले आहे.