पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ व्यवहारमयूख. वस्तु अमुकानें मजपाशी ठेविलेली आहे ती तूं त्यास दे' असें ह्मणून दिलेली वस्तु. 'या- चितं' ह्मणजे शोभेसाठीं लग्नकार्यांचे वेळीं वगैरे कोणाकडून मागून आणिलेला दागिना वगैरे. ' शिल्पिन्यासः ' ह्मणजे कांहीं दागिना वगैरे घडविण्यासाठी सोनाराजवळ व- गैरे दिलेलें [ सोनें, रूपें ] वगैरे.- नारदही असेंच ह्मणतो “ याचित, अन्वाहित, 'कारागिराजवळ दिलेलें [ द्रव्यादिक ] न्यास ( ठेव ), आणि प्रतिन्यास ( एकत्र वस्तु पुनः ठेव ह्मणून ठेवलेली ) या बाबतीत हाच नियम ठरविलेला आहे. १४७३ ' प्रतिन्यास ' धन्यार्ने ठेत्र ह्मणून दुसऱ्याजवळ ठेवलेले वस्तूची पुनः दुसरीकडे ठेव. दैवराजोपद्रवा- नें नष्ट झाली तरी कांहीं विशेष प्रसंगी कारागिराजवळ ठेवलेली ठेव परत दिली पाहिजे असें कात्यायन सांगतो " कारागिराने कांहीं वस्तु कांहीं मुदतीचे आंत तयार करून देण्याचा करार केलेला असून त्याप्रमाणे त्या मुदतींत ती त्यानें केली नाहीं तर त्यापुढें दैवराजोपद्रवानें जरी ठेवीचा नाश झाला तरी ती धन्यास [ कारागिराकडून ] परत देवविली पाहिजे. "४७४ नारद ह्मणतो:- एक वेळ जर वस्त्र धुतलें गेलें तर त्याचा आठवा हिस्सा किंमत उतरते; दोन वेळ धुतल्यास चौथा हिस्सा; तीन वेळ धुतल्या- स तिसरा हिस्सा; आणि चार वेळ धुतल्यास निम्मे. निम्मे किंमत झाल्यानंतरचे दरएक वेळचे धुण्यानें चौथा हिस्सा किंमत क्रमानें कमी होते. ' याज्ञवल्क्य (व्य० श्लो० २३८ ) “ घोत्रिणीनें [ धुण्यासाठीं आणिलेलीं ] लोकांचीं वस्त्रे वापरली तर ( नेसल्यास, पांघरल्यास वगैरे ) तिला तीन पण दंड केला पाहिजे ; परंतु कपडे विकल्यास, भाड्यानें दिल्यास, गहाण ठेवल्यास, किंवा उसने दिल्यास दंड दहा पण.४६ 'अवक्रयः' ह्मणजे भाड्याने देणे. 'आधानं ' ह्मणजे गहाण टाकणें. सोन्यावांचून इतर धातु अति घात- ल्या असतां कोणत्या मानानें कमी होतात त्याचें प्रमाण तोच स्मृतिकार सांगतो ( व्य० श्लो० १७८ ) “ विस्तवांत घातल्यानें सोन्याचें वजन कमी होत नाहीं ; रूपें शेंकडा दोन ( प्रमाणें ) कमी होतें ; कथील आणि शिसें शेंकडा आठ; तांबें शेकडा पांच ; आणि लोखंड शेकडा दाहा.' रुपें किंवा दुसऱ्या धातूंचें वजन या मानाचे वर कमी झाल्यास सोनार किंवा इतर कारागीर शिक्षेस पात्र होतो. सृत जर कारागिरास [ कापड काढण्या- साठीं ] दिलें तर [ कापडाचे ] वजनांत कशी वाढ येते याविषयीं तोच स्मृतिकार सांगतो ( व्य० श्लो० १७९ ) " लोकरीचे आणि कापसाचे सुताचे संबंधानें दर शेकडा दहा पलांची वाढ येते; [ तसेंच ] मध्यम जातीचे कापडांत शेकडा पांच; व तलम [ कापडांत ] शेंकडा तीन पर्ले वाढतात. ४७ कांहीं बाबतीत कमी वजन होतें याविषयीं तोच स्मृतिकार 66 १,४७७ ११४७५ ४७३ मि० व्य० प० पृ० २७ ; वी० प० ११४ पृ० १ ; व्य० मा०. ४७४ वी० प० ११४ पृ० १. ४७५ वी० प० ११५ पृ० १ ; व्य० मी०. ४७६ वी० प० ११५ पृ० १. ४७७ वी० प० ११५ पृ० १ ; क० वि०.