पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२.३४ व्यवहारमयूख. राहिलेलीं ] नसतील तर कर्ज देणें असेल तें त्या ब्राह्मणाचे सकुल्यांस ( कुळांतील पुरु- षांस ) द्यावें; सकुल्य नसल्यास बांधवांस द्यावें. सकुल्य किंवा बांधव हे दोन्ही नसल्यास तें ब्राह्मणांस द्यावें; ब्राह्मणही नसल्यास पाण्यांत सोडून द्यावें. १,४६३ प्रजापतिही असेंच ह्मणतो " बंधु नसल्यास ब्राह्मणांत द्यावें किंवा पाण्यांत टाकावें. [ कारण ] पाण्यांत टाकलें तें किंवा अग्नींत में टाकिलें तें धन परलोकीं [ टाकणाराचे ] उपयोगी होईल." कर्जाची रक्कम पाण्यांत वगैरे टाकल्यावर जर धनको हजर होईल तर त्याचे कर्ज त्यास मिळालेच पाहिजे. अमानत ठेव. नारद हाणतो " जेव्हां कोणी स्वतःचें द्रव्य ( किंवा हरकोणताही माल वगैरे ) शंका न धरितां विश्वासानें दुसऱ्याचे स्वाधीन करतो, तेव्हां त्या ठेवीस ज्ञाते 'निक्षेप ' ( अमानत ठेव ) असें व्यवहारशास्त्रांत ह्मणतात. न मोजतां, न समजतां, व शिक्का करून जें दुसऱ्याचे स्वाधीन केलें जातें त्यास 'उपनिधि' असें ह्मणावें; व मोजून वगैरे ठेविलें १,४६४ 6 तर तो 'निक्षेप ' समजावा. बृहस्पति “सोनें, रुपें, दान दिल्यानें किंवा अन्य धातूंचें दान केल्यानें, वस्त्रदान केल्यानें, किंवा शरणागताबें संरक्षण केल्यापासून जे पुण्य तें ठेव संरक्षणापासून आहे. जी वस्तु जशी व ज्या रीतीनें ज्यानें अमानत ठेवलेली असेल ती वस्तु तशीच त्याच माणसाला परत द्यावी; अमानत ठेव ठेवणाराचे कोणा जवळचे संबध्यास ती देऊं नये १४६५ न्यासः ' ह्मणजे ठेव. ' प्रत्यनन्तरः ' ह्मणजे ठेव ठेवणाराचा जवळचा संबंधी. मनु ( अ० ८ श्लो० १९१ ) " जो ठेव परत मागितली असतां देत नाहीं व जो न ठेवलेली वस्तु मागतो ह्या दोघांसही चोराची शिक्षा द्यावी; किंवा ठेवीचे रकमेइतका दंड त्यांपासून घ्यावा. “ बृहस्पति “ ठेव ठेवणाराने स्वतःचे हेळसांडीनें दुसऱ्याची ठेव ह्मणून योग्य रक्षण न केल्यानें ठेवलेले वस्तूचा नाश केला तर, किंवा ठेव परत मागितली असून परत न दिली तर, त्याजकडून ती ( ह्मणजे ठेवीची किंमत ) सव्याज देवविली पाहिजे." 'भेद' ह्मणजे अमुक आपली व अमुक दुसऱ्याची अशा -भेदबुद्धीनें दुसऱ्याचे ठेवीचे रक्षणांत केलेला भेद. याकरितां ठेव घेणाराचे ( ज्यापाशीं ठेव ठेविली त्याचे ) इतर वस्तूंबरोबर जर ठेवीचा नाश झाला, तर त्याबद्दल ठेव घेणारावर दोष येत नाहीं. याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ६७ ) “ठेव घेणारानें ठेविलेले ठेवीचा उपयोग ४६३ वी० प० ११० पृ० २; क० वि०, ध्य मा ०. ४६४ मि० व्य० प० ४६ पृ० १; वी० प० १११ पृ० २; क० वि०; व्य० मा० . ४६५ वी० प० ११२ पृ० १; ध्य० मा०; क० वि०. ४६६ वी० प० ११३ पृ० १.