पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ व्यवहारमयूख. पदामध्ये अन्यसंबंधिधनाचा अभाव किंवा कोणच्याही द्रव्यमात्राचा अभाव हे दोन्ही अभाव ग्राह्य आहेत. [ याचा तात्पर्यार्थ असा ]: आतां [ ज्यांनीं मृताचें कर्ज दिलेच पाहिजे त्यांत ] पहिल्यानें वारसा घेणारा येतो; तो नसल्यास बायको घेणारा ; तो नस- ल्यास ज्या पुत्रास वारसा मिळाली नाहीं तो पुत्र ; तो नसल्यास नातु; मुद्दल देण्यापुरता तो नसल्यास रिक्थी (ह्मणजे जे वारसा घेतात ते ) जसें पणतू, पत्नी, कन्या वगैरे; वारसा घेतलेला नसल्यास पणतूनें, पत्नीने वगैरे कर्ज देण्याची जरूर नाहीं. वारसा कितीही क्षुल्लक असो, तो घेतल्यास कितीही मोठें कर्ज असले तरी तें देण्याची जबाब- दारी येतेच; कारण वारसा घेणें हेंच कर्जाचे जबाबदारीस कारण होय. वारसा घेत- ला तितकीच किंवा त्याहून ज्यास्ती कर्जाची जबाबदारी असा कांहीं नियम नाहीं. वरील स्मृतीचे शेवटचे चरणाचा दुसराही अर्थ होतो तो असाः धनको निपुत्रिक मरेल तर त्याचा वारसा घेणारे वारिसांनीं, ह्मणजे पत्नी, कन्या वगैरेंनी, आपल्या नवऱ्याचें, बा- पाचें वगैरे [ अनुक्रमानें] ऋगकोकडून येणें कर्ज असेल तें वसूल करून घ्यावे. विष्णु तो " 'सपुत्र किंवा निपुत्रक मृताचें कर्ज त्याची मालमत्ता ( वारसा ) घेणारानें फेडावें. १४५२ बृहस्पति ह्मणतो " मृताची मालमत्ता घेणारे नसतील तर त्याची बायको घेणाराकडून त्याच रितीने कर्ज देववावें. " कात्यायन ह्मणतो " रोगा- दिकानें व्यथित नसून धनवान व वयांत आलेला पुत्र असल्यास त्याजकडून बापाचें कर्ज देववावें. तसा नसल्यास देवविण्याचें नाहीं. मालमत्ता घेणाराकडून पहिल्यानें देववावें ; नंतर पुत्राकडून ; पुत्र नसल्यास किंवा तो निर्धन असल्यास मृताची बायको घेणाराकडून. ११४५३ नारद ह्मणतो " [ मृताची ] बायको, कुटुंबांतील द्रव्य व मुलाबा- ळांसुद्धां कोणा तिन्हाईत मनुष्याचे आश्रयास जाऊन राहील तर त्यानें त्या स्त्रीच्या नवऱ्याचें कर्ज फेडलें पाहिजे, नाहीं तर तिला त्यानें दूर केले पाहिजे. ४४ कात्या- यन ह्मणतो “ज्यांस संतति नाहीं व द्रव्य नाहीं अशा मद्यपी वगैरे मनुष्यांनीं केलेलें कर्ज [ ते मेल्यावर ] त्यांच्या बायकांचा जे उपभोग करतील त्यांनी द्यावें. " 66 नारद ह्मणतो " [ मृताचें ] द्रव्य घेणारा, [ मृताची ] स्त्री घेणारा, आणि पुत्र यां- पैकी जो द्रव्य घेईल त्यानें कर्ज द्यावें; धन घेणारा व बायको घेणारा नसल्यास पुत्रानें द्यावें ; आणि धन घेणारा अन्य कोणी, किंवा धन घेणारा पुत्र नसल्यास बायको घेणा. रानें द्यावें. ११४५५ या वचनाचे शेवटचे चरणाचा अर्थ वरील याशवलस्यवचनाप्रमाणें ४५२ वी० प० १०६ पृ० २. ४५३ वी० प० १०८ पृ० २. ४५४ वी० प० १०७ पृ० २ ; ध्य १० मा० क० वि० ; ४५५ वी० प० १०८ पृ० १; क० वि० ; व्य० मा०.