पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २३१ बाप मरेल तेथें त्याचें कर्ज पुत्रांकडून देववावें. "४४७ वचनांत ' द्रव्य' शब्द आहे त्याचा अन्वय ' ऋते ' ( वांचून ) या शब्दाशी करावयाचा ह्मणजे द्रव्यावांचून [ बाप मरेल तेव्हां ]. बृहस्पति ह्मणतो " बापाचें कर्ज पहिल्यानें फेडलें पाहिजे. कर्ज फेडणें तें नेहेमीं या अनुक्रमानें फेडावें. १४४८ याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ४७ ) खेळणें ) यासाठीं बापानें आपल्या जातीवर 66 मद्यपान, रंडीबाजी, किंवा द्यूतकर्म ( जुवा काढलेले कर्ज, दंडाची किंवा जकातीबद्दलची देणें राहिलेली बाकी, किंवा कोणास व्यर्थ देणें कबूल केलेलें असेल तें, [ हीं बापाचीं देणीं ] पुत्रानें देऊं नये. १४४९ बृहस्पति ह्मणतो "मद्य, जुवा खेळणे यांबद्दलचें देणें, व्यर्थ 'कबूल केलेलें देणें, काम किंवा क्रोध यांस वश होऊन देऊं केलेलें देणें, जामिनकीबद्दलचे देणें व दंड किंवा जकात यासंबंधाचे देण्याची बाकी हीं बापाचीं देणीं पुत्राकडून 'देववूं नये. उशना ह्मणतो " दंड किंवा त्याची बाकी, जकात किंवा त्यासंबंधाची बाकी, किंवा कोणत्याही प्रकारचें बापानें केलेले व्यवहारास अयोग्य कर्ज पुत्रानें देण्याची जरूर नाहीं. १४५० ११४५० कर्ज ज्यांनी दिलेच पाहिजे त्यांचा अनुक्रम याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० ५१ ) " रिक्थग्राहाकडून (मृताची मालमता ज्यानें घेतली त्याकडून ) त्याचें (मृताचें ) 'कर्ज देववावें; किंवा योषिद्धा हाकडून (मृताची बायको घेणाराकडून ) देववावें; हे दोन्ही नसल्यास अनन्याश्रित द्रव्यानें (ज्या पुत्राने बापाचा वारसा घेतलेला नाहीं त्यानें ) द्यावें. ज्या मृत पुरुषास पुत्र नसतील त्याचे कर्ज रिक्थांकडून (त्याचा वारसा घेण्यास जे अधि- कारी असतील त्यांजकडून ) देववावें. ४४८ पुत्र जिवंत असूनही तो नपुंसक वगैरे अस- ल्यामुळे योग्य मार्गानें किंवा नपुंसक वगैरे नसून जो कोणी दुसरा अन्यायाचे मार्गानें - णजे पुत्र जिवंत असतांही त्याचे बापाचें द्रव्य घेतो तो 'रिक्थग्राहः . ' ' योषिद्राहः ' या- चप्रमाणे, मृताला पुत्र असूनही त्या मृताची बायको जो कोणी घेतो तो 'यो- षिग्राहः. ‘ अनन्याश्रितद्रव्यत्व' ( ज्यानें वारसा घेतलेला नाहीं अशा पुत्राची स्थिति ) हैं विशेषण तर पूर्वोक्त दोनही प्रकारांत लावावयाचें; कारण ' अनन्याश्रितद्रव्यः ' या ४४७ वी० ० १०६ पृ० २ व्य० मा० व स्मृतिचंद्रिका यांत ' द्रव्यमृते गृ०इंस्तु दाप्यते ' असा पाठ आहे. ४४८ वी० प० १०६ पृ० २; ध्य० मा० क० वि०. ४४९ वी० प० १०६ पृ० १; व्य० मा० क० वि०. ४५० वी० प० १०६ पृ० १. ४५१ मि० व्य० प० २० पृ० २, वी० प० १०६ पृ० १० क० बि०.