पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ ६४ ) 66 व्यवहारमयूख. तारणावर दिलेलें कर्ज व्याजाचे करणानें दामदुप्पट होईल तेव्हां तारणाचे उत्पन्नांतूनच मुद्दल रकमेची दुप्पट रक्कम उत्पन्न झाल्यावर तारण परत दिलेच पाहिजे. "४११ 66 6 6 जामीन. याज्ञवल्क्य याचे वचनाप्रमाणें जामीन तीन प्रकारचाः व्य० श्लो० ५३) ' [ कोणास वेळेस ] हजर करण्यासाठी, विश्वास पटविण्यासाठी, किंवा फेड करण्यासाठी जामीनगत द्यावयाचें सांगितलेले आहे. "*"" ' प्रत्येय ' ( विश्वास उत्पन्न करणें ) याचा अर्थ — हा माणूस प्रामाणिक आहे' असें ह्मणून विश्वास उत्पन्न करणें. बृहस्पति चार प्रकारचे जामीन सांगतोः “ पहिला ह्मणतो 'मी यास दाखवून देईन'; दुसरा ह्मणतो हा माणूस प्रामाणिक आहे ' ; तिसरा ह्मणतो ' मी हा पैसा देईन'; आणि चौथा ह्मणतो ' मी हा पैसा देववीन . " " ' अर्पयामि ' ह्मणजे ऋणकोकडून देववीन असा अर्थ. कात्यायन “ पळून गेलेल्या ( नाहींसा झालेल्या ) ऋणकोस शोधून काढण्यासाठी फार झाले तर तीन पंधरवड्यां पावेतों मुदत द्यावी. दरम्यानचे वेळांत जामिनानें त्यास दा- खवून दिलें तर त्यास जबाबदारीतून सोडलं पाहिजे. या वचनांत तीन पंधरवडे मुदत लिहिली आहे ही इयत्ता उदाहरणार्थ समजावयाची. तिचा अर्थ असा कीं, तपासा- साठी जितकी मुदत जरूर असेल तितकी . 29 ४३२ कात्यायन " ऋणकोस हजर करण्यासाठी राहिलेले जामिनानें ठरविलेले वेळेस आणि ठरविलेले जागीं ऋणकोस हजर न केल्यास, देवकृत व राजकृत उपद्रव झालेला न नसेल तर, देण्यास करार केलेला पैसा जामिनाकडून देवविला पाहिजे. १,४१३ 'निबंध- मावहेत्' ( करार केलेला पैसा देववावा), ह्मणजे धनको कर्ज देववावें. बृहस्पति “ पहिल्या दोन प्रकारच्या जामिनांकडून (ऋगकोस दाखवून देण्याची व तो प्रामाणिक आहे असें ह्मणण्याची जबाबदारी घेणाराकडून ) करार पुरा न झाल्यास घेतलेले कर्ज ठरविले वेळेस देवविलें पाहिजे. बाकीचे दोन जामिनांनी ( मी हा पैसा देईन व दे- ववीन अशी जबाबदारी घेणारांनी ), किंवा त्यांचे अभावी त्यांचे पुत्रांनी, त्यांवर फिर्याद झाल्यास त्याचप्रमाणें कर्ज फेडलें पाहिजे. १४१४ कात्यायन “ जामिनकीबद्दल- चें कर्ज नातवानें देण्याची बिलकूल जरूर नाहीं; परंतु पुत्रांनी मुद्दल दिलेच पाहिजे. १४३५ ४११ वी० प० ९९ पृ० २; क० वि० ; व्य० मा० . ४१२ मि० व्य० प० २४ पृ० १० वी० प० १०० पृ० १; क० वि०; व्य० मा ०. ४१३ वी० प० १०० पृ० १. ४१४ वी० प० १०० पृ० २; क० वि० ; व्य० मा०. ४१५वी० प० १०० पृ० २ ; क० वि०.