पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ १,३७२ व्यवहारमयूख. ( ह्मणजे दरमहा दरवर्षी वगैरे ) व्याज दिलें जातें तेव्हां त्यास ' शिखावृद्धि' ( हळू हळू वाढणारे) असें ह्मणतात. 'प्रतिकालं ' ह्मणजे दरदिवस दरमहा किंवा दरसाल अमुक अशा कराराने द्यावयाचें. याज्ञवल्क्य ( व्य० लो० ३७ ) " कर्जाबद्दल तारण धनकोचे स्वाधीन केलेलें असेल तेव्हां [ मुदलाच्या ] ऐशीव्या हिश्शाइतकी रक्कन ( सव्वा रुपया शेंकडा ) व्याज ह्मणून दरमहा घ्यावी. तारण दिलेले नसल्यास [ ऋणको- च्या ] वर्णानुक्रमाप्रमाणें दोन, तीन, चार, किंवा पांच [या भावानें] दर शेकडा घ्यावें. " ' 'अन्यथा' ह्मणजे तारण दिलेले नसल्यास. 66 व्यास तारण दिलेले असल्यास दर- महा दरशेकडा व्याजाचा दर [ मुदलाचा ] ऐशीका हिस्सा सांगितलेला आहे; जामीन दिलेला असल्यास साठावा हिस्सा ; आणि जामीनही दिलेला नसल्यास शेंकडा दोन सांगितलेला आहे. " याशवल्क्य (व्य० श्लो० ३८ ) " रानांत फिरणारा [ ऋणको ] असल्यास त्यानें दरशेंकडा दहा व समुद्रांत सफर करणारांनी वीस. " ' दद्युः ' ( द्यावें ) हैं पद पुढील वाक्यांतून संबंधाने घ्यावयाचें. ' सर्व वर्गांनी आपापल्या कोणत्याही वर्णा- च्या धनकोस ज्या भावानें कबूल केलें असेल त्या भावानें व्याज द्यावें. १३८० विष्णु “ मी उद्यां परत रक्कम देईन, असें कबूल करून कोणी उसनवार पैसा घेऊन [ त्यावर कांहीं नफा मिळविण्याचे ] लोभानें तो त्याप्रमाणें परत देणार नाहीं तर रक्कम घेतल्या दिवसा- पासून त्यानें व्याज दिले पाहिजे. उसनवारीवर व्याज देणें कात्यायन सांगतो 'याचना करून कोणी उसनवार पैसा मागून घेऊन तो परत न देतां देशांतरीं जाईल, तर एक वर्षापुढे त्या पैशावर त्याने व्याज दिले पाहिजे. कोणी उद्धार ( व्याजावांचून कर्ज ) घेतो आणि देत नाहीं, व मागावयास गेलें ह्मणजे दूर देशीं पळून जातो, त्या कर्जा-. `वर तीन महिन्यांपुढे व्याज चालू होतें. स्वदेशीं राहून जो ऋणको मागणी केली अस- तां कर्ज परत देत नाहीं त्याजकडून, तो कितीही नाखूष असला तरी, व व्याज देण्याची 46 ११३८१ कबुलायत नसली तरी, एक वर्षापुढें व्याज देवविले पाहिजे. १३८२ नारद " स्नेहधर्मास्तव उसनवार दिलेले वस्तूवर, करार नसल्यास, व्याज द्या. . वयाचें नाहीं; परंतु करार नसला तरी साहा महिन्यांपुढे व्याज चालू होईल. 99 का- त्यायन " प्रीतिदत्त ( मेहरबानीखातर स्नेहसंबंधानें वगैरे दिलेलें ) जें कर्ज असेल त्याची मागणी करण्यापूर्वी. त्यावर व्याज चालू होणार नाहीं; पण मागणी झाल्यावर ३७९ वी० प० ९१ पृ० १ ; क० वि०. ३८० बी० प० ९१ पृ० २ ; क० वि० 3 व्य० मा ०. ३८१ बी० प० ९३ पृ० १; क० वि० ; व्य० मा० . ३८२ मि० व्य० प० १८ पू० १० वी० प० ९३ पृ० ; क० वि० ; व्य० मा० .