पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २१७. ( कमी वर्णाचा पति व उंच वर्णाची पत्नी अशांचा) यांस वारशाचा अधिकार नाहीं व त्यांच्या पुत्रांसपितामहाचे जिनगीचाही हिस्सा घेण्यास अधिकार नाहीं. " आणि पुढील याज्ञवल्क्यवचनही त्याविषयींच आहे (व्य० श्लो० १४१) " [ अंश घेण्यास अनधिकारी असतील ] त्यांचे औरस व क्षेत्रज पुत्र निर्दोष असतील तर विभाग घेण्यास अधिकारी आहेत. "३७६ त्यांच्या कन्या व पत्नी यांविषयीं कांहीं विशेष याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १४१-१४२ ) " त्यांच्या ( विभागास अनधिकान्यांच्या ) मुलींचे विवाह करून त्यांस भत्यांच्या स्वाधीन करीपावेतों अन्नवस्त्र देऊन सांभा- ळाव्या ; व त्यांच्या बायका अपुत्र असून योग्य मागीनें वर्तणाऱ्या असल्यास त्यांस अन्न- वस्त्र द्यावें. त्या व्यभिचारिणी किंवा प्रतिकूळ असल्यास त्यांस घरांतून बाहेर काढून लावावें. १,३७७ मदन व इतर ग्रंथकार यांचें असें मत आहे कीं, व्यभिचारिणी असल्यास घराबाहेर काढून देऊन त्यांस अन्नवस्त्रही देऊं नये ; पण केवळ प्रतिकूलतेचे कारणानें घराबाहेर काढून देगें योग्य आहे, परंतु अन्नवस्त्र दिलेच पाहिजे. दायभाग समाप्त- ऋण वसुल करणें. 6 " धनकोनें कर्ज कबुलायत करून धनकोनें काय तजवीज करावी याविषयीं बृहस्पति नियम सांगतो देणें तें नेहेमी योग्य किंमतीचे तारण ( किंवा गहाण ) घेऊन, योग्य घेऊन, जामीन घेऊन, दस्तऐवज घेऊन, किंवा साक्षीचे समक्ष, द्यावें.७८ 'बंध: ' ह्मणजे लागू पडण्याजोगा करार किंवा कबुलायत ऋणकोकडून घेणें ; जसें ' तुझें कर्ज फेडीपावेतों हैं घर, जमीन, किंवा इतर वस्तु मी कोणास दान देणार नाहीं, किंवा विकणार, किंवा गहाण ठेवणार नाहीं ' इत्यादिक. 'लग्नक' ह्मणजे जामीन. तोच स्मृतिकार "जें कर्ज [ व्याजाचे द्वारें ] चौपट किंवा आठपट वाढलें त्यास ' कुसीद ' ( खिस्तीचे व्याज ) असें ह्मटलेलें आहे ; कारण कुत्सित ( हतभाग्य ) व सीदत् ( विपत्तिग्रस्त ) अशांपासून तें निःशंक मनुष्यांनी घेतलें जातें. १,३७८ कात्यायन " ऋणकोनें संकटकालांत असतां [ साधारण योग्य दराहून] अधिक व्याजाचा दर कबूल केला असेल तो त्यानें नेहेमी दिला पाहिजे. त्या दरास कारिता ' ( ठरविलेला दर) ह्यटलेलें आहे. जेव्हां वेळोवेळीं 6 ३७६ बी० प० २२२ पृ० ; क० वि० ; व्य० मा० . ३७७ वी० प० २२२ पृ० १ ; क० वि० ; व्य० मा ०. ३७८ बी० प० ९० पृ० २ क० वि० ; व्य० मा० . २८