पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ व्यवहारमधूख. त्या सर्वांस दायभाग घेण्याची योग्यता नाहीं. ३७३ बृहस्पति “ सवर्णास्त्रीपासून झालेला असूनही पुत्र गुणशून्य असल्यास वडिलार्जित धन घेण्यास अयोग्य होय. तें धन [मृतास] पिंड देणारे असे जे श्रोत्रिय ( विद्वान् ) असतील त्यांस द्यावयाचें. ऋणकोधनकोंपासून सोडविण्याचा पुत्राचा धर्म होय. याकरितां जो पुत्र याचे विरुद्ध वर्ततो त्यांचा कांहीं उपयोग नाहीं. "" ३७३ वारशांतून ज्यांस बाहेर टाकले जाईल त्यांस वारसा घेणाराकडून जन्मभर अन्न- वस्त्र मिळालें पाहिजे. याविषयीं मनु ( अ० ९ श्लो० २०२ ) " परंतु हें योग्य आहे कीं, [ वारसा घेणाऱ्या ] शहाण्या पुरुषांनीं आपल्या शक्तयनुसार वारसा घेण्यास अयोग्य ह्मणून ठरलेल्या मनुष्यांस जन्मभर अन्नवस्त्र द्यावें. न दिल्यास न देणारा पतित होईल. ' अत्यंत ' " असें स्मृतींत पद आहे त्याचा अर्थ जन्मभर. "ज्यांस विभाग मिळावयाचा नाहीं त्यांत अन्नवस्त्र द्यावें " हैं याशवल्क्यवचन पूर्वी सांगितलेलें आहे. परंतु ज्यांनी दुसरा आश्रम घेतला त्यांस व पतित आणि त्यांचे पुत्र यांस अन्नवस्त्र देण्याची जरूर नाहीं. याविषयीं वसिष्ठ " ज्यांनीं एक आश्रम सोडून दुसरा घेतला ते व नपुंसक, वेडे, आणि पतित यांस [ वारशाचा ] हिस्सा मिळावयाचा. नाहीं. [पण ] नपुंसक व वेडे यांस अन्नवस्त्र दिले पाहिजे. . या वचनांत दोघांसच अन्नवस्त्र द्यावयाचें सांगितलें त्यावरून इतरांस द्यावयाचें नाहीं असें समजावयाचें. देवल " बाप मेल्यावर नपुंसक, कुष्टरोगी, उन्मत्त, वेडगळ, आंधळा, पतित, पतितांची मुलें, निषिद्ध केलेलें चिन्ह धारण करणारा ग्रांस [ जिनगीचा ] हिस्सा मिळावयाचा नाहीं. पतित शिवाय करून बाकीच्यांस अन्नवस्त्र हीं द्यावीं. ३७४ वचनांत 'लिंगी ' असें पद आहे त्याचा अर्थ निषिद्ध केलेलें असें एखादें चिन्ह धारण करणारा. ३७१ 99 बौधायन " [ जिनगीचे हिस्से घेणारांनीं] व्यावहारिक रीतीस सोडून वागणारांस, आंधळा, वेडगळ, नपुंसक, व्यसनी, व रोगाने पिडलेला, व अकर्म करणारा यांस अन्नवस्त्र देऊन पाळावें. पतित व त्यांचे पुत्र यांस अन्नवस्त्र देण्याची जरूर नाहीं. ३५ मदन आणि इतर ग्रंथकार यांचे मतें, सन्यास आश्रमापासून भ्रष्ट झालेल्यास व त्यांचे पुत्रांस अन्नवस्त्र द्यावयाचें नाहीं. परंतु विष्णुस्मृतीप्रमाणें, विभाग घेण्यास अनधिकारी पुरुषांचे निर्दोष पुत्रांस विभाग मिळतोच. ती स्मृति " [जे अंश घेण्यास अनधिकारी असतील ] त्यांचे औरस पुत्रांस मात्र विभाग घेण्याचा अधिकार आहे; परंतु पतिताचे पुत्रांस नाहीं. पतित होण्यास कारणीभूत कर्म केल्यावर उत्पन्न झालेले पुत्र किंवा प्रतिलोम पुत्र ३७४ वी० प० २२१ पृ० २; क० वि०. ३७५ क० वि०.