पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ ४८८ खालील अन्नवस्त्राच्या फिर्यादीत मद्रास हायकोटीन नुकले असें ठरविलें कीं, नव- ज्यानें रांड ठेविली तरी जोपर्यंत तिशीं तिचा संपर्क होत नाही तोपर्यंत त्याच्या घरीं रहात नाही अशी तकरार चालणार नाहीं. ७ (६०.) पूर्वी कलम २८ ह्यांत मूळ स्मृत्युक्त वचनाचा प्रकार सांगितला; परंतु त्याप्रमाणे आचार साम्प्रत नाहीं. तो फारच भिन्न आहे. त्याचें थोडें दिक्प्रदर्शन केले. आतां आचारानें मुख्य मुख्य फेरफार कसे झाले आहेत तें थोडक्यांत सांगतों. त्यांत प्रथम सापिण्ड्यसंकोच किती झाला आहे ह्याचा प्रकार. ७२ (६१.) मामा आणि त्यांची प्रत्यक्ष. भाची यांचा विवाह चालू आहे. त्यावि षयीं आमचे मित्र त्रि० व्यं० इनामदार हे लिहितात त्यावरून दर १२ पुरुषांतून एका ब्रा- ह्मणाचें असें लग्न होतें, आणि तें मुद्दाम आदरानें करितात. ह्याविषय मि० स्टील यांचा लेख निराधार आहे. सर्व कर्णाटक व त्या खालच्या भागांमध्ये देशस्थ ब्राह्मणांत ही चाल पुरातन व प्रसिद्ध आहे आणि ती सर्व लोक मान्य करितात. भावाच्या मुलींची लग्ने करण्याविरुद्ध मद्रास हायकोटीनें आपला अभिप्राय दर्शविला आहे. ( ६२.) दुसरी चाल. मातुलकन्यापरिणय. ही सर्व द्राविडांत फार प्राचीनकालापासून चालत आली आहे; आणि ती वचनांवरून व निबंधकारांच्या ऊहापोहा- वरूनहि रास्त दिसते. ज्या जातींत प्रत्यक्ष ह्या चालीस अनुसरत नाहींत, तेथेंहि- तसें केल्यासारखें करितात. सोडमुंजीच्या वेळी मामा असल्यास तो मुलास आपली मुलगी देऊं करितो; व अन्यत्रस्थली प्रत्यक्ष वर हा. स्वतः बहिणीस मी तुझ्या मुलास मुलगी देईन असें ह्मणतो. (६३.) ह्याविषयी पूर्वी बरेच वादविवाद झाले आहेत आणि अद्यापि शुक्लयजु र्वेदीय लोकांत मामाचें कुलाहे वर्ज्य करितात; परंतु अन्यत्र हा प्रतिबंध दिसत नाहीं. कऱ्हाडे व देशस्थ ब्राह्मणांत ही चाल सर्वत्र प्रसिद्ध व मान्य आहे, व इतरांसही ती अभिमत होती, हे वरील कलमांतील हकीकतीवरून स्पष्ट दिसतें. सापिण्ड्य संकोचास मूल आचार आहे. ७१. बादशाहीण वि. मन्नथ आचारी. इं. ला. रि. १७ म. २६०. ७२. वैद्यलिंग वि० विजयामल. इं. ला. रि. ६ म. ४३. ७३. लग्नाच्या कामांत जाति, कुल, इत्यादिकांचे आचार प्रधान आहेतः- नारायणभट्टकृत प्रयोगरत्न (पत्र ७२ ) :- “ प्रयोगपारिजाते तु गृह्यपरिशिष्टानुसारेणकन्यादान तत्प्रतिग्रहजवनिकापूर्वकमन्त्रक न्निरीक्षणाक्षतारोपणदास्यादिदानपुरोधःकर्तृकाभिषेकपरस्परक्षीरघृततिलककरणमालारोपणपूर्व- संपादित कौतुकसूत्र बंधनगणपति पूजनक मुकबंधनादीत्ययमंनुष्ठानक्रमउक्तः सच देशाचा- रक्शेनानुसर्तव्यः ।