पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवाहाविषयीं. ४५ (१७.) आतां अजीं विवाह रद्द न करितां स्त्रीला निराळें राहून पोटगी केव्हां मागतां येईल, व नवऱ्याला स्त्रीला दूर केव्हां करितां येईल याबद्दल थोडें लिहितों. याच विषयाचा उल्लेख पुनः 'पोषण' सदरांत यावा लागेल तेथें विस्तर पहावा. ऐहिक संबंधानें ‘ दंपती’ व पारलौकिकसंबंधानें 'सहधर्मचारिणी' हे शब्द हिंदूंत भार्येची योग्यता काय मानितात हे चांगल्या रीतीनें दर्शवितात. भार्या ही प्रपंचांत भर्त्या- बरोबर मालकीण व परमार्थात त्याच्या पुण्याची हिसेदारीण असें जें धर्मशास्त्र सांगते त्या धर्मशास्त्रावर, हिंदू लोकांत स्त्री ह्मणजे केवळ इतर प्रापंचिक जिनसांतील एक जिन्नस आहे असे जें कांही लोक मानतात, तो मिथ्यारोप होय. साध्वी स्त्रीचा त्याग भर्ता करील, तर तो धर्मशास्त्राने दंड्य मानिला आहे. सर्वदा भर्त्याचें वचन पाळावें हाच स्त्रीचा मुख्य धर्म सांगितलेला आहे. यावरून आमरणान्त उभयतांनी एकत्र राहून धर्माचरण करावें. तसें न करील तो दोषी असा धर्मशास्त्राचा आशय आहे. तथापि समयविशेषीं विवाह रद्द न करितांही विवाहित जोडप्यांत पृथक् रहावें हें ध- र्मशास्त्राला असंमत दिसत नाहीं. नवरा सहापातकदूषित झाला असतां स्त्रीनें त्याच्या शुद्धीची वाट पहात रहावें. व तेथपर्यंत धर्माचरणाविषयी ती परतंत्र नाहीं, स्वतंत्र आहे, असें याज्ञवल्क्यस्मृतीत सांगितलेले आहे. यावरून तो दोषी आहे तेथपर्यंत तिनें पृथक् रहावें असे दिसतें. ६५] प्र० २ (१८.) नवऱ्यानें धर्मान्तर केल्यास त्याचे वैवाहिक हक्क नष्ट होतात, हें युक्ति- सिद्ध असून शास्त्र व रूढी दोन्ही तशींच आहेत." नवरा जात्यंतर केल्यावर जर मरेल तर त्याच्या बायकोस त्याचा वारसा मिळत. नाहीं, कारण अशा योगानें विवाहसंबंधच नष्टं होतो.“ स्त्रीनेंही तर्से केल्यास ती पतित व भ्रष्ट होईल, आणि तिचा लग्नसंबंध सुटून ती पोष्यवर्गातूनही अर्थात् जाईल. परंतु अलीकडे मद्रास हायकोर्टाचा धर्मान्तरानें वैवाहिक हक्क जात नाहीं असा ठराव झाला आहे. ६९ ( ५९.) नवरा हा जारिणीशीं अथवा परस्त्रीशीं रत होईल, अथवा तिला दुसरी इजा देईल, तर धर्मपत्नीचें त्यानें स्वतंत्र पालनपोषण ( ती स्वधर्मानें वागत आहे तोपर्यंत ) केले पाहिजे असा शास्त्राचा आशय मला दिसतो. परंतु क्रिमिनल प्रोसीजर कोड क० ७० ६५. पहा व्य० म० स्त्री पुं० धर्मप्रकरण; याज्ञवल्क्य आचाराध्याय श्लो० ७६. ६६. याज्ञवल्क्य आचाराध्याय लो० ७७. ६७. पहा सन १८६६ चा आक्ट २१ ; वी. रि. हा. ५ पा. २३५. ६८. सीनामल वि. मद्रासचे आमिनिस्ट्रेटर जनरल इं. ला. रि. ८ म. १६९: ६९. आड्मिनिस्ट्रेटर वि. आनंदाचारी (इं. ला. रि. ९ म. ४६६). ७०. या बाबदीचा खुलासा इं. ला. रि. २ मुंबई ६३४ यावरील ठरावांत पहावा.