पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ व्यवहारमयूख. षयींची परिभाषा व्यर्थ होईल, झणून 'स्त्रीधनं स्यादपत्यानाम् ' ( स्त्रीचें स्त्रीधन [ति- च्या ] अपत्यांचें वगैरे ). ‘स्त्रीधनं दुहितॄणां ' ( स्त्रीधन कन्यांचे वगैरे). ह्या बृहस्पतिव गौतमवचनांतील स्त्रीधन शब्द पारिभाषिकच ( स्त्रीधनपरिभाषेनें ज्या अर्थी ठरविलेला आहे त्या अर्थीच ) समजावयाचा. कांहीं वचनांत ' स्त्रीधन ' शब्द नसून 'मातृक- धन' असे त्या अर्थाचे शब्द आहेत, जसें ' भजेरन् मातृकं रिक्थम् ' ( मातेचें द्रव्य घ्यावें ). तेथेंही त्या शब्दांनी पारिभाषिक स्त्रीधनच समजावयाचें. [ कारण या सर्व वचनांचें श्रुतिरूप ] मूळ एकच आहे अशी कल्पना करण्यांत लाघव आहे. आतां “ मातापितरांचे [मरणा ] नंतर त्यांचें द्रव्य व त्यांचे कर्ज पुत्रांनीं सारखीं वांटून घ्यावीं" असें याज्ञवल्क्यवचन ( व्य० श्लो० ११७) आहे त्यांतील द्रव्य शब्द पारिभाषिक स्त्रीधनावांचून वारशानें मिळालेले किंवा सूत काढणें वगैरे हस्तकौशलाचे कामावर मिळालेले द्रव्य असेल त्याचा मात्र बोधक समजावयाचा. . यावरून असें निष्पन्न होतें कीं स्त्रीच्या पारिभाषिक स्त्रीधनावांचून बाकीचें धन कन्या असल्या तरी पुत्रादिकांसच मिळावयाचें. ३५९ पुत्र किंवा कन्या या दोन्ही प्रकारची संतति नसल्यास पारिभाषिक स्त्रीधनावर वा- रसा कोणाचा याविषयीं याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १४४ ) " [ स्त्री ] संतति नसून मेल्यास तिचें द्रव्य ( स्त्रीधन ) . तिचे बांधवांनी ( बंधुवर्गानें ) घ्यावें. "" निरनिराळे विवाहांच्या भेदाप्रमाणे बांधवांच्या वारशाच्या अधिकाराविषयींची व्य- वस्था तोच स्मृतिकार ( याज्ञवल्क्य ) सांगतो ( व्य० श्लो० १४५ ) " ब्राह्म आदि- करून [[विवाहाचे ] जे चार प्रकार त्यांतून कोणत्याही प्रकारच्या विवाहविधीनें लग्न झालेले स्त्रीचें स्त्रीधन तिला संतति झालेली नसल्यास नवयाकडे जाते; बाकीचे चार विवाहविधींतून कोणत्याही विधीनें विवाह झालेला असल्यास, मातापितरांकडे जाते; परंतु तिच्या कन्येची संतति असल्यास [ तें स्त्रीधन तिच्या कन्येच्या कन्यांकडे जातें ]. "३६० नवरा नसल्यास त्याच्या कुळांतला तिचा अगदी जवळचा असेल तो घेईल. तसेंच [ तिचा ] बाप नस- ल्यास बापाचे कुळांतील तिचा अगदी जवळचा संबंधी वारीस. कारण “ मृताचे द्रव्यावर मालकी अगदी जवळच्या सपिंड संबंध्याची " या मनुवचनानें (अ० ९ श्लो० १८७) मृताचें घन घेण्याचा अधिकार प्राप्त होण्यास मृताचा निकट संबंध हेंच कारण आहे असें मनुनें सांगितलेले आहे. यासंबंधाने “नवरा नसेल तर तत्प्रत्यासन्नानां (त्याचे अगदी जवळचे सपिंडांचें ), व पिता नसल्यास तत्प्रत्यासन्नानां ( त्याचे अगदी जवळचे सपिंडांचें ” असें मिताक्षरा ग्रंथांत ( व्य० श्लो० १४५ ) झटलेलें आहे खरे, पण तेथेही 'तेन अस्याः प्रत्यासन्नाः १ तत्प्रत्यासन्नाः ( त्याचे द्वारें तिला जवळचे ३५९ जी० दा० प० २३१. ३६० वी० प० २१८ पृ० १; क० वि०; व्य० मा० .