पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २११ या स्मृती- णतो ( अ० ९ श्लोक० १९८ ) " कोणत्याही प्रकाराने बापानें स्त्रीस दिलेलें द्रव्य तें त्या स्त्रीच्या ब्राह्मणीकन्येनें घ्यावें किंवा त्या कन्येच्या अपत्यांनी तें घ्यावें. "३५३ त ' वा ' ( किंवा, शब्द आहे तो ) ' च ' (आणि) या अर्थी आहे, ह्मणून कन्या व तिची अपत्यें यांनी विभागून घ्यावें असें सिद्ध होतें. - कोणी ह्मणतात की, 'ब्राह्मणी [ कन्या ] असें पद आहे तें समानजाति किंवा वरिष्ठ वर्णजातीच्या कन्येचे अर्थी आहे. परंतु असें ह्मणण्यास आधार काय याविषयी संशय आहे.. 66 कारण, " मातेचें द्रव्य कन्या नसल्यास कन्यांची संतति [ स्त्रीधन घेतात ]. ( स्त्रीधन ) कन्या घेतात ; कन्या नसल्यास तदन्वय ( कन्यांची संतति ) घेते. १ ३५५ असें नारदवचन आहे. निरनिराळ्या आयांच्या कन्यांस किंवा कन्येच्या पुत्रांस मिळ- याचे जे विभाग ते ' निरनिराळे बापांचे पुत्रांचे विभागांचे बाबतींत बापांचे संख्येप्रमाणे हिस्से' असा जो साधारण नियम पूर्वी गेला आहे त्याचे साम्यावरून करावे. पण तिचें कर्ज देणें असेल तें फेडून बाकी राहील तें द्रव्य कन्या घेतात ; कन्या नसल्यास कन्यांची संतति [ वारस होते ], असें याज्ञवल्क्यवचन ( व्य० श्लो० ११७ ) आहे, त्या वचनांतही ‘अन्वयं ' शब्द कन्यांचे अपत्यांकडे लागू आहे असें कोणी क्षण- तात. दुसऱ्या ग्रंथकारांचें मत आहे कीं, वरील नारदवचनांत 'तदन्वय: ३ पद आहे त्यांतील ' तत् ' शब्द मागील मातृशब्दाचाच बोधक आहे ह्मणून कन्या नस- ल्यास पुत्रांनीच मातेचें द्रव्य घ्यावे. हा पक्ष शिष्टाचारास मिळतो. ' शेषं ऋणात् (ऋण देऊन बाकी राहिलेलें ) याचा अर्थ संप्रदाय जाणणारे असा करितात कीं, [जे- व्हां मातेचे ] द्रव्य कर्जाबरोबर किंवा कमी असेल तेव्हां पुत्रांनीच घ्यावे... ३५६ ३५८ • ३५७ 66 असें कारण कन्या न- कन्या वगैरे नसल्यास पुत्रपौत्र वगैरेंनीं [ स्त्रीधन ] घ्यावें. सल्यास त्या द्रव्याचा वारसा पुत्रांचा [आहे ]" असें कात्यायनवचन आहे. आ- ईच्या द्रव्याचा वारसा कन्यादिकांनीं घेण्याचा अधिकार जो वर सांगितला आहे हा अ- ध्यग्नि, अध्यावहनिक इत्यादि पूर्वी सांगितलेलें पारिभाषिक स्त्रीधन याविषयीं मात्र अस समजावें; कारण मातेचें हरकोणतेही प्रकारचें धन असें घेतल्यास स्त्रीधन शब्दावि- ३५३ मि० व्य० प० ६३ पृ० २; वी० प० २१७ पृ० १; क० वि०; व्य ० मा० .. ३५४ मि० व्य० प० ६३ पृ० १; वी० प० २१७ पृ० १. क० वि० ३५५ वी० प० २१७ पृ० १. ३५६ विज्ञानेश्वरादिकांसही हाच पक्ष इष्ट आहे. कमलाकरास विरुद्ध पक्ष इष्ट आहे.. ३५७ ' तदन्वय ' या शब्दांतील तत् शब्दाने. ३५० वी० प० २१७ पृ० १० क० वि०.