पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० व्यवहारमयूख. अनुवाद या मनुवचनानें केला. त्या पुत्रांनी एकत्र मिळून घ्यावें असें अपूर्व विधान येथें केलेलें नाहीं, असा मिताक्षरेचा अभिप्राय आहे. दुसऱ्या कांही ग्रंथकारांचें असें 'मत आहे कीं, अन्वाधेय व पतीनें प्रीतिदत्त या दोन प्रकारच्या स्त्रीधनाविषयीं मात्र कन्या व पुत्र यांनीं एकत्र निळून समभाग घेण्याचा हा अपूर्व नियम या वचनानें केला. ३४८ ११ बहिणीचे संबंधानें कांहीं विशेष मनु सांगतो ( अ० ९ श्लो० १९२ ) " स्त्रीधन स्त्रीचे अपत्यांकडे जाते. कन्येचें लग्न झालेले नसल्यास ती त्या धनाची विभागी आहे; 'पण लग्न झालेलें असल्यास तिला तिच्या मानासाठी मात्र कांहीं द्यावयाचें. 3 ' तदं- शिनी' ह्मणजे पुत्राइतका विभाग घेणारी. ' अप्रत्ता ' विवाह न झालेली. एक अवि- वाहित व लग्न झालेली दुसरी असल्यास त्या दुसरीस किंचित् द्रव्य तिच्या मानार्थ द्यावा असा अर्थ. अविवाहित कन्या नसल्यास कात्यायनस्मृतीप्रमाणें विवाहित कन्या व भाऊ यांनी समभाग घ्यावें. स्मृति “ लग्न झालेले बहिणींनी भावांबरोबर विभाग घ्यावा. ११ ३४९ मनुवचनाप्रमाणे मुलींचे मुलींसही कांहीं अल्पस्वल्प दिले पाहिजे (अ० ९ श्लो० १९३ " मुलींच्या मुली असतील त्यांसही त्यांचें योग्यतेप्रमाणें स्वाभाविक प्रीतीचें दर्शक झणून आजीच्या (आईच्या आईच्या ) द्रव्यांतून कांहीं अल्पस्वल्प द्यावें. " ३५० परंतु यौतक ह्मणून जें स्त्रीस लग्नाचे वेळेस दिलेलें असतें तें अविवाहित कन्यां - 'कडेच जाते; पुत्रांकडे जावयाचें नाहीं.. याविषयीं तोच स्मृतिकार (मनु) (अ०९ श्लो० १३९ ) " यौतक ह्मणून आईचें जें धन असेल तें अविवाहित कन्येचाच भाग होय. ' 'यौतक' ह्मणजे लग्नाचे प्रसंगी किंवा दुसऱ्या एखादे धर्मकृत्याचे वेळेस पतिसह वर्तमान एका असनावर स्त्री बसलेली असतां तीस मिळालेलें तें 'युत '; एका- सनी बसलेले स्त्रीपुरुषः तत्संबंधाचें तें ' यौतिक ' असें निघंटुचे आधारावरून मदन ह्मणतो. 91 349 "" अन्वाधेय व नवऱ्याने दिलेलें प्रीतिदत्त हे प्रकार शिवाय करून पूर्वी सांगितलेले 'पारिभाषिक स्त्रीधनाचे संबंधाने कांहीं विशेष नियम गौतम सांगतो अविवाहित व गरीब कन्यांकडे स्त्रीचें स्त्रीधन जातें. " अप्रतिष्ठिताः ' ह्मणजे ज्यांच्याजवळ द्रव्य नाहीं अशा [ कन्या ]. ३५२ 6 ब्राह्मणी स्त्रीच्या कन्यांनीं आपल्या सावत्र आईचेंही द्रव्य घ्यावें असें मनु ह्म- ३४८ वी० प० २१६ पृ० २; व्य० मा० क० वि०. ३४९ बी० प० २१६. पृ० २. ३५० मि० व्य० प० ६३ पृ० १; वी० प० २१६ पृ० २; क० वि० ३५१ वी० प० २१६ पृ० २; क० वि०; व्य० मा० . ३५२ मि० व्य० प० ६३ पृ० १; बी० प० २१७ पृ० १; क० वि०; व्य० मा० . •