पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीळकंठीय 333 २०७ ( जिनगी किंवा द्रव्यावर ), किंवा बाप वगैरे इतर संबंधी शिवाय करून स्नेही वगैरेंनी स्त्रियांस दिलेल्यावर ( जिनगी किंवा द्रव्यावर ) स्त्रियांची मालकी नाहीं. " कलाकौ- शल्याचे द्वारान [ स्त्रियांनीं ] जें काय मिळविलेले असेल त्यावर, व पूर्वी सांगितलेले पित्रा - दि संबंधी शिवाय करून इतर मित्रादिकांनी स्त्रियांस जें दिलेलें असेल त्यावर, नवऱ्याची मालकी; याशिवाय जें राहिलेले असेल तें स्त्रियांचें स्त्रीधन असें ह्मटलेले आहे. "३३३ आणि "भार्या, पुत्र, दास, [यांस स्वतंत्रतेने द्रव्य नाहीं ] सर्व निर्धन. ते जें द्रव्य मिळवितील तें ज्याचे ते त्याचें समजावें ३३४ असें वचन आहे तेंही कलाकौ - शल्यावर मिळविलेले धनासच लावावें आधिवेदनिकादिक इतर प्रकारच्या स्त्रीध- नावर देखील या वचनावरून स्त्रीची परिपूर्ण मालकी राहात नाहीं असें ह्मण युक्त होय, सव मनु (अ० ९ श्लो० १९९ ) " अनेक मनुष्यांच्या कुटुंबांतील द्रव्याचा निर्धार (खर्च) किंवा खुद आपल्या स्त्रीधनांतूनही खर्च आपल्या भर्त्याच्या आज्ञेवांचून स्त्रियांनीं कधीं करूं नये. १३३५ स्मृतीत 'निर्धार' पद आहे त्याचा अर्थ खर्च. कांहीँ प्रकारच्या स्त्रीधनाचे संबंधाने स्त्रियांस परिपूर्ण मालकी आहे याविषयीं कात्यायन सांगतो “ विवाहित स्त्रीस मिळालेलें, अविवाहित कन्येस [ होणाऱ्या ] नवऱ्याच्या घरांतून किंवा तिच्या बापाच्या घरांतून मिळाले, भावापासून व आई किंवा बापापासून मिळालेलें में द्रव्य त्यास ' सौदायिक ' ह्मणतात. ['ज्या अर्थी हें स्त्रीधन ] त्यांच चरितार्थासाठीं प्रीतीचे कारणानें दिलेलें असतें, [त्या अर्थी] अशा द्रव्यावर स्त्रियांची पूर्ण मालकी असणे इष्ट होय. सौदायिक स्वधिनावर स्त्रियांची सर्वदा पुरी मालकी आहे असें सांगि- तलेलें आहे ; व इच्छेस येईल त्याप्रमाणे सौदायिक स्थावर असले तरी देखील तें विकण्यास किंवा त्याचें दान देण्यास तिला अधिकार आहे. " स्त्रीधन नवऱ्याने दिलेले असल्यास त्यावर स्वातंत्र्य नाहीं, कारण नवऱ्याने स्वस्त्रीस जें दिलें असेल तें स्थावर नसेल तर नवरा मेल्यावरही तिचे इच्छेस येईल त्याप्रमाणें तिनें त्याचा उपभोग करावा व त्याचें दानही पाहिजे तर तीनें करावें” ३३७ असें नारदवचन आहे. 46 परंतु स्थावर खूष झालेल्या स्त्रीधनावर नवऱ्याची किंवा इतरांची मालकी नाहीं असें तोच स्मृतिकार (नारद) सांगतो नवरा, पुत्र, बाप, किंवा भाऊ यांस स्त्रीधन घेण्याचा किंवा ३३३ ‘निर्धनाः सर्व एव ते' असा पाठ येथें आहे, परंतु 'त्रय एवाधनाः स्मृताः' असा पाठ वीरमि- घोदय मंथांत आहे. ३३४ वी० प० २१४ पृ० २. ३३५ बी० प० २१५ पृ० १. ३३६ मि० व्य० प० ६२ पृ० २; वी० मि० व्य० २१५ पृ० १; व्य० मा० क० वि०. ३३७ मि० व्य० प० ४७ पृ० १; बी० प० २३५ पू० २; व्य० मा० ; क० वि०.