पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ 6 व्यवहारमयूख. असें ह्मणतात. घरांतील वापरण्याच्या भांड्यांची, ओझीं वहाणाऱ्या जनावरांची, दूध देणाऱ्या गाईंची, किंवा दागिन्यांची किंमत ह्मणून स्त्रीस जें काय मिळालेलें असेल त्यास 'शुल्क' असें ह्मटलेले आहे. १३२७ कन्यादानाचे वेळेस घरकामांतील भांडी वगैरे सामान द्यावयाचें असतें तें देण्यास सवड नसल्यास त्यांचे ऐवजीं जें द्रव्य क- न्येस दिलें जातें तें शुल्क असा अर्थ. आधिवेदनिकाची व्यवस्था याज्ञवल्क्य सांगतो. ( व्य० श्लो० १४८ ) " नवयाने एका बायकोस उल्लंघून दुसरे लग्न केल्यास पहिल्या बायकोस, तिला स्त्रीधन दिलेले नसेल तर, दुसऱ्या लग्नास जितका खर्च लागला असेल तितकें आधिवेदनिक द्रव्य ( बायकोस उल्लंघिल्याबद्दल तिच्या समजुतीसाठीं दिलेला पैसा), द्यावें. स्त्रीधन दिलेले असल्यास अर्धे मात्र द्यावें. ११३२८ “ अर्द्ध' असें स्मृतींत ट लेलें आहे त्याचा अर्थ, दुसन्या लग्नास लागलेल्या रकमेइतकें स्त्रीधन होण्यास जेवढे कमी असेल तेवढ़ें. देवल " [ स्वस्त्री ] भर्त्याने देऊ केलेलें स्त्रीधन 'पुत्रांनी ऋणस्वरूप समजून द्यावेंच. ११३२९ ' प्रतिश्रुत' ह्मणजे स्वपत्नीस देऊ केलेलें. स्त्रियांस द्रव्य देण्याचे सं- बंधानें कांहीं विशेष नियम कात्यायन सांगतो "बाप, आई, नवरा, भाऊ, जात- भाऊ यांनीं आपापल्या शक्तीप्रमाणें, स्थावर शिवाय करून, एकंदरीत दोन हजार [ पण नांवाचें नाणें ] पावेतों स्त्रीस स्त्रीधन' द्यावें. "३३० स्थावर शिवाय करून. दोन हजार पणपावेतों द्यावें असें मदन ह्मणतो [ त्यावरून वरील अर्थ आला ]. व्यासाचें तसेंच ह्मणणे आहे 'धनांतून फार झालें तर दोन हजार पणांपावेतों देणगी स्त्रीस द्यावी. " 33 ही जी दोन हजारांपावेतों मर्यादेची देणगी सांगितली ती प्रतिवर्षी द्यावयाची असा अर्थ आहे. [ कारण ] तोच स्मृतिकार ह्मणतो की, अने- क वर्षाबद्दल देणें असल्यास या रकमेहून जास्ती, आणि शक्ती असल्यास, स्थावरही देण्यास प्रतिबंध नाही. 66 इतर विभागींस फसवून कपटानें स्त्रीस द्रव्य दिलें असल्यास त्यावर, व केवळ आंगावर घालण्यासाठीं दिलेले दागिने वगैरे असल्यास त्यांवरची मालकी स्त्रीची नाहीं असें कात्यायन सांगतो “ कपट करण्याचे हेतूनें किंवा कांहीं विशेष हेतूनें बाप, भाऊ, नवरा यांनी स्त्रियांस दिलें असेल त्या द्रव्यास स्त्रीधन ह्मणावयाचें नाही. १,३३२ स्मृतिकाराचे ह्मणण्याप्रमाणें स्त्रियांनी स्वतःच्या कलाकौशल्यावर मिळविलेल्यावर ३२७ मि० व्य० प० ६२ पृ० १; वी० प० २१४ पृ० २; क० वि०; व्य० मा ०. ३२८ वी० प० २१५ पृ० १; क० वि० ; व्य० मा० . ३२९ वी० प० २१६ पृ० १. ३३० वी० प० २१५ पृ० १; व्य० मा० .. ३३१ वी० प० २१५ पृ० १; क० वि०. ३३२ वी प० २१४ पृ० २, व्य० मा० .. याच