पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय २०५ याबद्दल ' या तस्य दुहिता' ( जो त्याची कन्या) असाही पाठ कोण मानिला आहे. [ ते कन्येस अधिकार आहे असें ह्मणतात ]. कन्या व बहीण या नसल्यास अगदी जव- ळचा सपिंड वारीस होतो. स्त्रीधन. मनुः (अ० ९ श्लो० १९४ ) “ जें अध्यग्नि ( विवाह होमाचे वेळेस अग्नीजवळ कन्येस देणगी ह्मणून दिलेलें ), अध्यावहनिक ( विवाहसंबंधी वरात वगैरे सोहाळ्यांत नवरीस दिलेली ) देणगी, प्रीतिसंबंधाने दिलेले, तसेंच भाऊ, आई, बाप, यांनी प्रत्येकीं दिलेली देणगी [ द्रव्य वगैरे ]; असे सहा प्रकारचें स्त्रीधन सांगितलेले आहे. ३२४ येथें ‘ षट् ' ‘( सहा ) असें पद आहे तें त्याहून कमी संख्येचें निवारक असें ( स्त्रोध- नाचे प्रकार सहापेक्षां कमी. नाहींत अशा अर्थी) समजावयाचें. असा अर्थ केल्यानें पुढील याज्ञवल्क्य स्मृतींत आधिवेदनिकापर्यंत स्त्रीधनाचे ६ प्रकार सांगून अधिक प्रकार- च्या संग्रहार्थ आद्य पद घातलें आहे तें सुसंगत होतें. ती स्मृति (व्य० श्लो० १४३ ) "पिता, माता, पति, भाऊ, यांनी प्रत्येकीं दिलेलें, अध्यग्नि ( विवाह वेळचे अग्नीचे ज वळ मिळालेलें ), किंवा आधिवेदनिक ( दुसरो बायको करते वेळेस पहिलीचें उल्लंघन केल्याबद्दल तिचे समाधानार्थ दिलेलें द्रव्य ), किंवा अशा प्रकारचें दुसरें यास 'स्त्री- धन ' असें नांव आहे. ११३२५ विष्णुही साहांपक्षां अधिक प्रकार सांगतो ३२६ 66 बाप, आई, पुत्र, भाऊ यांनी प्रत्येकीं दिलेलें, अध्यग्नि ( विवाहाचे वेळचे अग्नीजवळ मिळा- लेलें ), आधिवेदनिक ( दुसरी बायको करते वेळेस पहिलीस दिलेलें ), बंधुदत्त ( आपले, आपले बापाचे, किंवा आईचे आतेभाऊ, मावसभाऊ, मामेभाऊ यांनी दिलेलें ), शुक्क ( वस्तूंचे ऐवजी दिलेलें द्रव्य ), व अन्वाधेयक ( विवाहानंतर मिळालेलें ), [ यांस स्त्रीधन ह्मणावें ]. ' अध्यग्नयादिकांचें स्वरूप कात्यायन सांगतो “वि- वाहाचे वेळेस अम्नीचे जवळ जें स्त्रियांस दिलें नातें त्यास सत्पुरुषांनी ' अध्यग्नि ' हें नांव दिलेलें आहे. बापाचे घरांतून [ नवऱ्याचे घरीं ] नेते वेळेस जें स्त्रीस दिलें जातें त्यास ' अध्यावाहनिक' असें ह्मटलेले आहे. प्रीतीचे कारणानें सासूनें किंवा सासऱ्यानें जें स्त्रीस ( सुनेस ) दिलें तें, किंवा पादवंदनिक ( चरणवंदन करते वेळेस वडील माणसांनी दिलेलें ) त्यास ' प्रीतिदत्त ' ह्मणतात. [ आणि ] विवाह झाल्या- नंतर नवयाच्या किंवा बापाच्या कुळाकडून स्त्रियांस मिळालेले द्रव्यास अन्वाधेय ' ३२४ मि० व्य० प० ६२ पृ० २; वी० प० २९४ पृ० १; क० बि० व्य० मा० . ३२५ बी० प०२१ ४ पृ० १; क० वि०, ध्य० मा०, ३२६ वी० प० २१४ पृ० १. 6