पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ व्यवहार मयूख. 66 पि चादद्यात्सृष्टो नान्यमातृजः । संसृष्टिनस्तु संसृष्टी सोदरस्य तु सोदरः ॥ ' अशी प्रमाणें पूर्वी सांगितलींच आहेत. बायकोच एकटी संसृष्ट झालेली असेल तर “ संसृष्टीनें संसृष्टीचें द्रव्य घ्यावें ” या वचनावरून तिनेंच द्रव्य घ्यावयाचें. परंतु बायको व अनेक इतर संबंधी [मृतसंसृष्टीशी ] संसृष्ट झालेले असतील, तर इतर संबंध्यांनी मात्र द्रव्य ध्यावें; बायकोनें घ्यावयाचे नाहीं. संसृष्टिप्रकरणांत शंख व नारद यांनीं हाच नियम सांगितलेला आहे. तो असा " बंधूंतून कोणी निःसंतान मरेल किंवा कोणी सन्यास घेईल तर स्त्रीधन सोडून त्याचें धन बाकी राहिलेल्या भावांनीं वांटून घ्यावे. त्यांनी त्याचे ( मृताचे ) बायकांस, त्यांनी नवऱ्याची शय्या निर्दोष राखिल्यास, जन्मभर अन्नवस्त्र द्यावें. ज्या त्याप्रमाणें चालणार नाहींत त्यांस देऊं नये. त्याला कन्या असल्यास तिच्या बापाचे हिश्शांतून तिला अन्नवस्त्र द्यावें; तिचें लग्न होईपावेतों तिला विभाग मिळावा; लग्नांनंतर तिचा नवरा पोषणकर्ता.” येथें जशी 'यस्य हविर्निरुप्तं' इ० (ज्याचें तंडुलादि द्रव्य मोजून घेतलें जातें ) आणि त्या निर्वापाच्या ( मोजून घेणें वगैरेचे) पूर्वी जर चंद्रोदय होईल, तर त्यानें तंडुल द्रव्याचे तीन विभाग करून प्रायश्चित्तयाग करावा वगैरे या वाक्यांत ' हविः अभ्यु- दियात् ' या पदांनीच पुरोडाशादिहविर्द्रव्यसंस्काराचा निश्चय होतो, ह्मणून निर्वापपदाची वि- वक्षा राहात नाहीं, तसें प्रकरणावरूनच या 'भ्रातृणाम प्रजाः प्रेयात् ' वाक्यांतील 'भ्रातृणां ' हें पद अविवक्षित आहे, ह्मणजे संसृष्ट भावांचाच संग्रह होतो असें नाहीं तर जितके संसृष्ट होऊं शकतात तितक्या सर्वांचा संग्रह होतो असें समजावयाचें. " जो अपुत्र असून स्वर्गास जातो त्याचें द्रव्य भावांकडे जाते; भाऊ नसल्यास मातापितरांनीं तें घ्यावें; किंवा ज्येष्ठ पत्नीनें घ्यावें,३२१ असें संसृष्टिप्रकरणांत शंखानें जरी ह्यटलेलें आहे, तरी त्यांतील अभिप्राय मदन असा काढतो कीं, चुलता, पुतण्या, सावत्र भाऊ [ आणि इतर ] यांशीं कोणी संसृष्ट झाला असून तो, चुलता, पुतण्या आणि सावत्र भाऊ हे सर्व वारल्यावर मरेल, तर त्याचें अ- संसृष्ट भाऊ आणि इतर असंसृष्ट संबंधी यांमध्यें वारशाचा क्रम स्थापण्यासाठी वरील व- घन आहे; आणि अशा प्रसंगी पहिला वारस माता व दुसरा पिता असें त्याच ग्रंथका- चें मत आहे. स्मृतींत ' ज्येष्ठा' असें पद आहे त्याचा अर्थ जिनें इंद्रियनिग्रह केला असेल अशी ज्येष्ठ पत्नी पत्नी नसल्यास बहीण. याविषयीं बृहस्पति ह्मणतो * बायको किंवा आईबाप मागें न राहतां जो अपुत्र पुरुष स्वर्गास जातो त्याचा विभाग घेण्यास त्याचे बहिणीस अधिकार आहे. "३२३ " या तस्य भगिनी' ( जी त्याची बहीण ) ३२२ ३२१ मि० व्य० प० ५९ पृ० १; वी० प० २१३ पृ० १; ध्य० मा० क० वि०. ३२२ जी० दा० प० ३४३. ३२३ व्य० मा०; क० बि० वी० प० २१३ पृ० २.