पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. • प्र० २ ६३ ( ५४. ) आलीकडे मुंबई हाय कोटीनें तारीख १२ जून सन १८८२ इसवी रोजीं ठराव केला आहे त्यांत पाटाच्या लग्नाच्या संबंधानें पूर्वीची सक्ती काही कमी केल्यासारखी दिसते. ४४ ( ५५. ) राही वि. गोविंद ( इं० ला० रि० मुं० वा० १, पा० ९७ ) यांत पाट लावणाऱ्या बाईच्या तर्फे तिच्या पूर्वनवयाने सोडचिठ्ठी दिल्याचा अगर अन्य रीतीनें पाटास आपली संमति दिल्याचा पुरावा झाला नाहीं, इतक्यावरून ती दासी न मानितां व्यभिचारांत राहणारी स्त्री मानण्यांत आली. परंतु वरील कलमांत लिहिलेल्या कज्जांत राहीनें पाट लाविला त्या वेळी तिचा नवरा हयात होता ही गोष्ट शाचीत असतां सोड- चिठ्ठीचा पुरावा मागितल्यावांचून फक्त पूर्वनवयानें वादी हिला परत घेण्याचा यत्न केला नाहीं, एवढ्यावरून त्याच्या संमतीचें अनुमान करून तिला मयतं नवऱ्याच्या मिळ- कति हिसा देवविला. हा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा ठराव हाय कोर्टानें बाहाल केला. ( ५६. ) लग्न रद्द करण्याबद्दलचा दावा कोर्टात आणितां येणार नाही असे दि- सते, कारण ज्या आक्टांवरून कोटसि विवाहसंबंधींच्या दाव्यांचा निर्णय करण्याचा अधिकार येतो त्या सर्व आक्टांत हिंदूंचे विवाह वर्ज्य केलेले आहेत. नवऱ्याचें क्लीबत्व किंवा महारोग या कारणांनी किंवा अन्य कारणानें स्त्रीला सोडचिठ्ठी मिळणें हें व्यवहार- दृष्ट्या न्यायाचें दिसत असून नवरा देत नसेल, तर जातीचे लोक एकत्र मिळून देतात. तो त्यांचा अधिकार कोर्टें काढून घेऊं लागली तर आपल्याला प्रतिकार करितां येत नाहीं, अशा संकटांत कित्येक स्त्रियांस पाडल्याचा दोष कोर्टोवर येणार आहे. व्यभिचाररत स्त्रीस नवरा परत घेईल तर तिच्या पोटगीची व तिचें कर्ज देण्याची जबाबदारी त्यावर येते. खालच्या जातीमध्यें नवऱ्याच्या इच्छेस येईल तर त्यानें सोडचिठ्ठी दिल्यावर दुस- ज्या पुरुषाशी स्त्रीचा पाट लागतो. कांही जातींत दैवाच्या सल्लयाविरुद्ध आपला नवरा नपुंसक आहे किंवा आपले त्याचें एकत्र राहणें बनत नाहीं अशा सबबेवर स्त्री लग्न तोडूं इच्छील तर विवाह तुटतो. ६३. दुसरें अपील नं० ४४२ सन १८८१ इसवी. ६४. आक्ट ४ सन १८६९ (ख्रिस्ती लोकांविषयीं ). 59 " " 95 १५ १८६५ (पारशांविषयीं). २१ १८६६ (धमीन्तर केलेल्या एतद्देशीयांबद्दल ). १८७२ (ख्रिस्त्यांबद्दल ). ३ ,, १८७२ ( हिंदु व आणखी लोक खेरीज करून अन्यधमीच्या लोकांबद्दल ). 23