पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ व्यवहारमयूख. घुलता वगैरेचाही संग्रह होतो. कारण अन्योदरापासून झाला वगैरे हा अवयवार्थ चुलता वगैरे यांतही तुल्यच आहे. असें न पटल्यास संमृष्टिसंबंधापासून होणाऱ्या कार्यावांचून दुसरें कांहीं कर्तव्य संपादण्याचे नसल्याने चुलत्याशीं वगैरे संसृष्टिसंबंधप्रतिपादनार्थ मात्र वचन सांगितलें असें होऊन वचनास व्यर्थता येते. ' असंसृष्ट्यपि ' या शब्दाचा 'देह- लदीपन्याया'ने (उंबऱ्यावर दिवा ठेविल्याने घरांत व बाहेर उजेड पडतो तशा रीतीनें) अलीकडील व पलीकडील पदांशी अन्वय होतो. 'संसृष्ट' ( पुन: एकत्र झालेला ) या पदाची आवृत्ति करून एकानें द्रव्यसंबंधानें संसर्ग झालेला, व दुसऱ्याने उदरसंसर्ग झालेला अशा सोदराचे वाचक घ्यावयाचें. 'अपि ' ( ही, समुच्चयार्थक ) हा शब्दही द्रव्यसं- सर्गवान् या अर्थाचें बाधक जें वरील संसृष्ट पद. त्यानंतर जोडावा. ' एव ' ( च, ह्मणजे निश्वयार्थक ) या पदाचा वचनाच्या शेवटी अध्याहार करावयाचा. याप्रमाणें केल्यावर वरील वचनाचे निरनिराळे वाक्यार्थ असे होतातः [ प्रथम ] अन्योदर्य ह्मणजे निर- निराळ्या आईपासून झालेले; जसे बायको, बाप, आजा, सावत्र भाऊ, व चुलता वगैरे. जर ते संसृष्ट असतील तर त्यांनीं द्रव्य ध्यावें. - [ दुसरा ] अन्योदर्य संसृष्ट नसल्यास त्यांनी द्रव्य घेऊं नये. त्यानें भिन्नोदराला धनग्रहणाविषयीं अन्वयव्यतिरेकन्या- यानें संसृष्टसंबंधच कारण आहे असे सांगितलें आहे. ( कारण असेल तेथेंच कार्य होऊं शकतें यास अन्वय; व कारण नसेल तेथें कार्य होऊं शकत नाहीं यास व्यतिरेक ह्मणतात. असा न्याय प्रसिद्ध आहे, तदनुसार ). तसेंच [ तिसरा ] सोदर भाऊ द्रव्यद्वारा संसृष्ट नसेल तरी [ सोदरत्वानेंच ] त्याने द्रव्य ध्यावे. या [ व्याख्यानानें ] द्रव्य घेण्यास सोदरत्व मात्र कारण सांगितलें. [ चवथा ] जो केवळ द्रव्यासंबंधाने मात्र संसृष्ट असून दुसऱ्या आईपासून उत्पन्न झालेला असेल त्या एकट्यालाच सर्व द्रव्य मिळू नये. यावरून असें सिद्ध होत आहे की, द्रव्य एकत्र केल्यानें संसृष्ट झालेला एक वा- रीस असेल व दुसरा सोदर ( एकाच उदरापासून उत्पन्न झालेला ) असेल तर दोघांनी द्रव्य ( समभाग ) विभागून घ्यावें. संसृष्टिप्रकरणांत ( संसृष्टीस वारसा घेण्याचे अधिका- राचे विचारांत ) हाच अर्थ मनूनें स्पष्ट करून दाखविलेला आहे ( अ० ९ श्लो० २११-२१२ ) “ सर्वात वडील किंवा कोणताही इतर भाऊ आपल्या विभागास मुकेल किंवा कोणी भाऊ मरेल तर त्याचा हिस्सा नाहींसा झाला असें होत नाहीं; पण त्याचे सोदर भाऊ आणि बहिणी आणि विभाग झाल्यावर जे पुनः एकत्र झालेले असतील त्या सर्वांनी एकत्र मिळून तो भाग समभाग वांटून घ्यावा. ' हीयेत ' असें पद स्मृतीत आहे त्याचा अर्थ आश्रम बदलल्यामुळे, किंवा पातककमीनें पतित झा- 396 ३१०मि० व्य० प० ६१ पृ० २; वी० प० २११ पृ० १; क० कि व्य० मा०.