पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय 6 २०१ संसृष्ट झालेला असेल व दुसरा पौत्र असंसृष्ट असेल तरी त्या सर्व पुत्रपौत्रांस सारखेच अंश मिळतील. तसें झालें असतां व्यवहारशास्त्राचे नियमांस आधार जो आचार ( वहिवाट ) त्याच्या विरुद्ध ही गोष्ट होईल. पुनः असें कोणी ह्मणेल कीं, अपुत्रस्य ' या शब्दाची अनुवृत्ति न केल्यास वचन सपुत्रासही लागू होईल; त्या कारणानें [ मेलेल्या संसृष्टीचे ] असंसृष्ट पुत्र असून संसृष्ट भाऊ वगैरे असल्यास त्यांस वारसा मिळेल, पुत्रांस मिळणार नाहीं असें होईल. परंतु तसे होण्याची शंका करूं नये. या [ १३८ श्लोकाच्या] उत्तरा- र्धाचे व्याख्येंत या पूर्वपक्षाचा परिहार आमी करूं. ३१६ आतां या प्रथम चरणाच्या अर्थाचा अपवाद सांगतों. सोदरस्य (इत्यादि वाक्यांत) 'संसृष्टिनः संसृष्टी' अशीं पढ़ें जोडतों. मेलेल्या संसृष्टीचें धन, त्याचे सोदर व असोदर असे दोन्ही भाऊ [ संसृष्टी असल्यास ], सोदरसंसृष्टीनेच घ्यावें, असा अर्थ. आतां उत्तरार्ध. 'द- द्याच्चापहरेच्चांशं जातस्य च मृतस्य च ' या० व्य० श्लो० १३८ ( मृतसंसृष्टीचें द्रव्य त्याच्या औरसपुत्रास संसृष्टभावानें द्यावें, त्याला पुत्र नसल्यास आपण घ्यावें ). द्रव्याच्या विभागाचे वेळेस विभाग घेण्यास अधिकारी अशा मृतसंसृष्टीची स्त्री गर्भिणी असल्याबद्द - लची स्पष्टता झालेली नसून तिला पुढें पुत्र होईल, तर त्या पुत्रास त्याचे बापाचा अंश [ बापाशों ] संसृष्ट जो त्याचा चुलता वगैरे त्यानें द्यावा; पुत्र नसल्यास त्यानें तो अंश ध्यावा, हा अर्थ. या ठिकाणीं बापाचें द्रव्य घेण्याच्या अधिकारित्वास केवळ पुत्रत्वच प्रयो- जक आहे, विभागानंतर जन्म हें प्रयोजक नव्हे. कारण पुत्रत्व जसें प्रयोजकत्वानें लृप्त ( निश्चित ) आहे तसें हें नाहीं, व गौरवदोष येतो. शिवाय संसृष्टीस विभागापूर्वी देशां- तरीं पुत्र झालेला असेल व देशांतरामुळे ती गोष्ट समजलेली नसेल, तर त्यास अंश मिळ- णार नाहीं असें होऊं लागेल. याकरितां विभागापूर्वी उत्पन्न झालेल्या, परंतु संसृष्ट न झा- लेल्या, पुत्रासही संसृष्ट चुलत्यानें वगैरे वारसा दिलाच पाहिजे. संसृष्ट न झालेला सोदरभाऊ आणि संसृष्ट झालेला सावत्र भाऊ यांनी द्रव्य सारखें वांटून घेण्याविषयींचा नियम याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १३९ ) " निराळ्या आईपासून झालेला [ भाऊ ] संसृष्ट असल्यास त्यानें द्रव्य ध्यावें, पण निराळ्या आई- पासून झालेला असून संसृष्ट झालेला नसेल, तर त्यास अधिकार नाहीं; सोदर भाऊ संसृष्ट झालेला नसेल तरी त्यानें द्रव्य घ्यावें; आणि निराळया आईपासून झालेला असून संसृष्ट असला तरी त्यानें एकट्यानेंच द्रव्य घ्यावयाचें नाहीं. ( दुस-या आईपासून झालेला ) व अन्यमातृजः ला वगैरे) या पदांपासून केवळ सावत्र भाऊ समजावयाचा 6 ३१६ बी० प० २१० पृ० २; क० वि०, ध्य० मा०. ३१७०वी० प० २११ पृ० १; क० वि०, ध्य मा० . " 19 ३७ या वचनांत 'अन्योदर्यः' ( अन्य मातेपासून झाले- नाहीं; त्या शब्दांनी २६