पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० व्यवहारमयूख. वडिलार्जित द्रव्याचा खर्च करून ( विद्याधन व शौर्यधन ) मिळविले नसेल तरच मि- ळविणारास दोन भाग; परंतु संसृष्टघनाचे विभाग करण्यांत तें ( विद्याधन किंवा शौ- र्यधन ) संसृष्टद्रव्याचा खर्च करून मिळविलेले असले तरी मिळविणारास दोन हिस्से द्यावे, असा अर्थ केल्यानें मात्र या वचनास सार्थकता येते. ( असा अर्थ न केल्यास हें वचन निरर्थक होईल. ) 66 ३१५ 66 संसृष्टीचें धन घेण्याचा अधिकार याज्ञवल्क्य सांगतो ( व्य०. लो० १३८ ) संसृष्टीनें संसृष्टीचें द्रव्य घ्यावें; सोदर भावाचें धन सोदरभावाने घ्यावे. " पत्नी व कन्या" [ या वारिस होतात] ( या० व्य० श्लो० १३५ ), इत्यादिक पूर्वीचे वचनाचें हें वचन बाधक आहे, ह्मणून त्याचा अर्थ असाः पत्नीत्वादिधर्म संसृष्ट धन घे प्रयोजकीभूत होत नसून [ संसृष्ट धन ] घेण्यास संसृष्ट संबंधच प्रयोजक आहे. विज्ञानेश्वर ( मि० व्य० प० ६० पृ० १) आणि मदनादिक ग्रंथकार यांचे मत असें आहे: ' सामान्य नियमाची जितकी व्याप्ति तिच्या पोटांतच अपवादाची सारखेपणाने व्याप्ति' हा जो साधारण नियम आहे तदनुसार [ स्वर्यातस्य ह्यपत्रस्य श्लो० १३६ यांतील ] स्वर्यातस्य अपुत्रस्य या पदाच्या अनुषंगाने हीं पढ़ें ( संसृष्टीनें संसृष्टीचें द्रव्य घ्यावें वगैरे ) आलेली आहेत, झणून पुत्र, पौत्र, प्रपौत्र नसलेल्या संमृ- ष्टीच्या धनाच्या संबंधाचें हैं वचन समजलें पाहिजे. ह्मणून पुत्र, पौत्र, प्रपौत्र नसलेला संसृष्टी गेल्यास त्याचें धन पत्न्यादिक जवळचे संबंधी असतांही, ते संसृष्ट झालेले नसतील, तर दुसरा जो संसृष्टी असेल तोच घेईल. परंतु हें ह्मणणं योग्य ह्मणतां येत नाहीं. कारण [ श्लो० १३६ यांतील ] स्वर्यातस्य ह्यपुत्रस्य या पदाचीं पुढील स्मृतींत अनुवृत्ति केल्यावांचून [ संसृष्टीने संसृष्टीचें धन घ्यावें वगैरे ] वचनाचा अर्थ होत असतां अनुवृत्ति करण्यास कांहीं प्रमाण नाहीं. [सामान्य नियम व अपवाद यांच्या व्याप्तीचा जो सारखेपणा तो सर्वांशी अपेक्षित नाहीं ; मेलेल्याच्या सपिंडसंबंध्यांचे संबंधानें जितका असेल तितक्यानें निर्वाह होईल. " , 66 अपुत्रस्य ' या पदाचा अनुषंग सोडल्याने अर्थात् ' स्वर्यातस्य ' या पदाचाही संबंध सुटल्यानें " मृतस्य या अर्थाची [ पुढील स्मृतींत ] प्राप्ति होणार नाहीं, असें कोणी ह्मणेल तर तसंही नाही. 'हीयेतांशप्रदानतः " " प्रियेतान्यतरोवापि " [ इत्यादि ] पुढे येणाऱ्या मनुवचनानें त्या अर्थाची प्राप्ति होते. परंतु ['अपुत्रस्य ' या पदाची ] अनुवृत्ति केली तर सपुत्र मरणाराचे संबंधानें हैं वचन लागू होणार नाहीं, ह्मणून बापाबरोबर संसृष्ट झालेला एक पुत्र असेल व दुसरा असंसृष्ट असेल, तसेंच एक पुत्र ३९५ बी० प० २१ पू० २; क० वि०; व्य० मा० .