पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ व्यवहारमयूख. " सपिंड सर्व सपिंड ( बापाकडे सात व आईकडे पांच पिढ्यांपावेतों संबंधी ) व समानोदक ( बापाकडील चौदा पिढ्यांचे संबंधी ) हे निकट संबंधाचे अनुक्रमानें [ धन घेण्यास अधि- कांरी ]. सपिंड समानोदकांची मर्यादा मनु सांगतो (अ० १ श्लो० ६० ) संबंध ( पितापुत्र अशा सरळ अनुक्रमानें ) सातव्या पिढीपुढे तुटतो; व समानोदक संबं- ध ( ज्यांचें उदकतर्पण करण्याचा अधिकार आहे अशांशी असलेला संबंध ) जन्म व नांवें जेव्हां ठाऊक नाहींशी होतात तेव्हां तुटतो. १३०० ' सप्तमे ' असें पद स्मृतीत आहे त्याचा अर्थ सातवा पुरुष धरून (सातवा पुरुष संबंधांत आला, पुढे संबंध नाहीं ). सो- दक पुरुष नसल्यास बंधु [ वारसा घेतात ]. स्मृत्यंतरी ( बौधायन स्मृतीत ) त्यांची गणना केलेली आहे. आपल्या बापाच्या बहिणीचे पुत्र ( आतेभाऊ ), मावशीचे पुत्र ( मावसभाऊ ), व मामाचे पुत्र ( मामेभाऊ ), हे ' आत्मबंधु ' असें समजावें. बा- पाचे आतेभाऊ, बापाचे मावसभाऊ, व बापाचे मामेभाऊ यांस 'पितृबंधु' असें समजावें. आईचे आतेभाऊ, आईचे मावसभाऊ व आईचे मामेभाऊ यांस मातृबंधु ह्मणावें. "३• * यांमध्यें ( वारशाचा) अनुक्रम वचनांत सांगितल्याप्रमाणे. अ 66 302 येथें कोणी अशी शंका घेईल कीं, पत्नी, कन्या करेस मृताचें धन घेण्याचा अधिकार सांगितला तेथें मृताच्या पत्नी व मृताच्या कन्या असेंच समजलें जातें व मृता- च्या पत्नी, कन्या, यांस विभाग घेण्याचा अधिकार मृताशी असलेल्या संबंधानें येतो त्या अर्थी बंधूंस वारसा सांगितला तेथे बंधुशब्दाने मृताचा मात्र बंधु कां घेऊं नये, मृताचे बापाचे व आईचे बंधु कां घ्यावे, व त्यांनां द्रव्य घेण्यास कोठून अधिकार येईल ? वरील बौधायन स्मृतीत आपल्या बापाचे बहिणीचे पुत्र वगैरे में सांगितलेलें आहे त्यावरून आत्मबंधु, पितृबंधु, मातृबंध या संज्ञा व त्या संज्ञांनी संबंधी कोण समजावयाचे इतकेंच सांगण्याचा हेतु ; त्यांचा धन घेण्यास अधिकार सांगण्याचा हेतु नाहीं. त्यावर उत्तर सांगतों: बापाचा मामा, बापाचा चुलता वगैरे शब्दांचा अर्थबोध जसा होतो त्याप्रमाणेंच पितृबंधु, मातृबंधु वगैरे शब्दांनीं उक्त जे संबंधी पुरुष त्यांचाही बोध या स्मृतिवचनावांचूनही त्या त्या शब्दांच्या अवयवशक्तीनेंच सहज होण्यासारखा असूनही, केवळ या संज्ञा व या संज्ञांनी समजण्याचे पुरुष सांगण्यापुरताच या स्मृतिवचनाचा हेतु आहे असें त्यानें वचनास व्यर्थता येते, ह्मणून धन घेण्यास अधिकारी अशा बंधुवर्गात पितृबंधु व मातृबंधु यांस आणल्याने मात्र वचनास सार्थकता येते. बंधूंचे ३०० मि० व्य० प० ६० पृ० २; वी० प० २०९ पृ० २ ; क० वि० ; व्य० मा० . ३०१ आत्मबंधु वगैरेंचे लक्षणासंबंधी श्लोक बौधायनस्मृतींतले आहेत असें माधवाचे ग्रंथावरून सिद्ध होत आहे. मि० व्य प० ६० १० १; बी० प० २०९ पृ० २; व्य० मा० ; क० वि०. ३०२ आवांतर बंधूंचे संबंघानेही हाच क्रम आहे असें समजावे.