पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ व्यवहारमयूख. " पितरौ ' असें पद आहे हें [ व्याकरणांतील ] ' एकशेष ' संज्ञक वृत्तिरूप झालेलें आहे. यांत मूळचा क्रम कसा ह्मणजे प्रथम माता किंवा पिता हें जरी स्पष्ट समजत नाहीं, तरी त- दर्थबोधक विग्रहवाक्य 'माता च पिता च' यांत मातृशब्दाचें उच्चारण शिष्ट लोक पूर्वी कर- तात. याकरितां पूर्वी माता नंतर पिता, असा अनुक्रम सिद्ध होतो. यास दुसरे कारण, ज्या द्वंद्वाचा बाधक ' एकशेष ' आहे त्या द्वंद्वसमासांत मातापितरौ असाच क्रम आहे. . तिसरे कारण, अनेक पत्नींपासून झालेले सर्व पुत्रांस साधारणत्वानें पिता आहे परंतु माता ह्मणजे जिचा पुत्र तीच ; ह्मणून मातृसंबंध पितृसंबंधापेक्षां अधिक निकट होतो. याकरितां पहिल्यानें मातेला भाग द्यावा, माता नसल्यास पिल्याला. " पण असें ह्मणण्यास वर लिहिलेले विष्णुवचनाशी प्रत्यक्ष विरोध येत असल्या का- रणामुळें तें टाकिलें पाहिजे. विज्ञानेश्वराचें ह्मणणे योग्य नाहीं याला दुसरें कारण असें आहे: माता न पिता च ' या विग्रहवाक्यांत मातृशब्द पहिल्यानं असावा याविषयीं प्र- माण नाहीं. तसेंच द्वंद्वाचा बाधक एकशेष असें विज्ञानेश्वर ह्मणतो, परंतु द्वंद्वसमास नि- सत्य नाहीं, वैकल्पिक आहे, ह्मणून त्या दोन वृत्तीत परस्पर बाध्यबाधकभाव असल्याबद्द - ल प्रमाण नाहीं. तिसरे कारण, अनेक पुत्रांस पिता साधारण व माता असाधारण असें आहे, तरी ती स्थिति पूर्वी माता घ्यावी किंवा पिता घ्यावा या अनुक्रमाचे निर्णयास आधार धरण्यास प्रमाण नाहीं. माता नसल्यास सोदर ( एकाच आईचे ) भाऊ ; तो नसल्यास त्याचा पुत्र (पुतण्या ). परंतु विज्ञानेश्वर वगैरे ग्रंथकार ह्मणतात की (मि० व्य० श्लो० १३६ ), सोदर भाऊ नसल्यास भिन्नोदर (दुसऱ्या आईचे ) भाऊ ; ते नसल्यास सोदर भावाचे पुत्र [ वारिसदार होतात ]. परंतु असें नाहीं. कारण, वचनांत 'भ्रातरः' असें पद आहे त्याचा सोदरपक्षीं मुख्यार्थ घेऊन, असोदरपक्षी गौणार्थ घ्यावा लागेल व येणेंकरून वृत्ति- द्वयदोष ( एकाच शब्दाचे एकाच काळी शक्तीनें व लक्षणेनें दोन अर्थ करणें हा दोष ) येतो. कोणी असें ह्मणतात की, 'भ्रातरः" असें पद स्मृतीत आहे तेव्हां ' भ्रातृपुत्रौ स्वसृ- दुहितृभ्यां ' या पाणिनीय सूत्राधाराने 'भ्रातरश्च स्वसारश्च ' ( भाऊ आणि बहिणी ) या दोन पदांची विरूपैकशेष नांवाची (निरनिराळे स्वरूपांच्या पदांची वृत्ति होऊन एकच पद परिणामी राहातें या नांवाची एक वृत्ति आहे ती ) वृत्ति केल्यानें ' भ्रातरः " असें रूप होतें, ह्मणून ‘भ्रातरः’" या पदानें भाऊ आणि बहिणी असें समजून 'आई नसल्यास भावांकडे जात ' असें [ विष्णुवचनांत ] लटलेलें आहे, त्यावरून आई नसल्यास भावांकडे व भाऊ नसल्यास बहिणीकडे वारसा जातो. परंतु तसें नाहीं. कारण, • भ्रातरः ' हा शब्द विरूपैकशेषवृत्तिरूप आहे अशी कल्पना करण्यास कांहीं एक आधार नाहीं. चुलत्याचे मरणाचे वेळेस बाप जिवंत असल्यामुळे पुत्रास चुलत्याचे